पुदिना लागवड
श्री. मोहन हरिभाऊ जाधव.,
मु.पो. खडका, ता. घनसावंगी, जि. जालना - ४३१२०९.
मो. ९०४९७१३१४०
पुदिन्याला काहीजण 'पहाडी पुदिना' असे म्हणतात. इंग्रजीत त्याला 'स्पीअरमिंट' असे म्हणतात.
तो आणि पेपरमिंट किंवा जपानी मिंट हे एकाच 'मेंथा' कुळातील आहेत. पुदिन्याचे शास्त्रीय
नाव 'मेंथा स्पायकाटा व्हेरायटी व्हिरीडीसी' असे आहे.
पुदिना ही वनस्पती काटक, गुळगुळीत बहुवर्षीय व सुमारे ३० सें.मी. ते ९० सें.मी. उंच वाढणारी असून त्याचे मूलस्थान उत्तर इंग्लंडमध्ये आहे. पुदिन्याची लागवड सध्या भारतभर अनेक भागांमध्ये करतात. पुदिना बहुवर्षायु असला तरी चांगले उत्पादन व कोवळी पाने मिळण्यासाठी दरवर्षी नव्याने लागवड करतात.
पुदिन्याची पाने उंच सखल, बिन देठाची, लंबवर्तुळाकार टोकाची असून त्यांना दातेरी काठ असतात. पानाचा वरचा पृष्ठभाग गुळगुळीत असला तरी खालच्या बाजूला ग्रंथी असतात. फुले लांब दांड्यावर मोकळी असतात.
लागवड : पुदिना सर्व प्रकारच्या जमिनीत वाढतो. त्याला पाणी जास्त लागते. तथापि शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत घातलेल्या पोयटा जमिनीत हे पीक चांगले फोफावते. ह्या पिकाची अभिवृद्धी जुन्या पिकातील खोडाच्या दांड्यापासून मुळासह करतात. पावसाळ्याचे सुरुवातीस त्याची शेतातील वाफ्यात लागवड करतात. त्यावेळी दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. आणि रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. पिकात तण वाढू देऊ नये. कोरड्या हवामानात पिकाला पाणी द्यावे. एकदा लागवड केलेल्या पिकापासून अनेक वर्षे पुदिन्याची पाने मिळतात. पण पिकाच्या चांगल्या वाढीसाठी दर वर्षी लागवड करणे फायद्याचे आहे.
वसंत ऋतूत पिकावर तांबेरा पडतो. त्या रोगाचे नियंत्रणासाठी शेतात लागवड करण्यापूर्वी जुन्या खोडाचे तुकडे (बेणे) ११५ अंश फॅ. तापमानाच्या गरम पाण्यात २ मिनिटे बुडवून काढावेत. त्याचप्रमाणे पाने सडण्याचा रोगही ह्या पिकावर येतो.
घरातील उपयोगाकरिता पुदिना लाकडी अथवा प्लॅस्टिक खोक्यात माती घालून लावता येतो. सावलीतही तो वाढतो. त्याचे खोड जमिनीत लांब वाढत जाते. वर्षातून २ - ३ वेळा किंबहुना अधिकच वेळा जमिनीवर काही सें. मी. खोडाचे खुंट ठेवून पुदिन्याची कापणी करता येतो. कापणीनंतर ह्या खुंटापासून पुन्हा वाढ होते.
काढणी केलेला पुदिना बाजारात विक्रीसाठी पेंढ्या बांधून पाठवितात. घरातील उपयोगासाठी पुदिन्याची पाने तोडून गरम कोरड्या जागी पसरून वाळवितात किंवा पुदिन्याच्या फांद्या टांगून पाने वाळू देतात आणि नंतर वाळलेली पाने तोडतात. ही पाने चहा (मिंट टी) किंवा मिंट जेली. मिंट सॉसेज किंवा संत्र्याचे रसात घालून वापरता येतात.
पुदिन्यातील अन्नघटक : पुदिन्याचे ताज्या हिरव्या पानात ८३ टक्के पाणी, ४.८ टक्के प्रथिने, १.६ टक्के खनिजे (कॅल्शियम, मँगॅनीज, फॉस्फरस, लोह व तांबे) असतात. शिवाय अ व ब जीवनसत्त्वे असतात. पानांना विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो आणि पानांची चव किंचित तिखट असते. पेपरमिंटची पाने तोडात टाकली असता काही वेळाने जिभेला गारवा वाटतो तसा अनुभव पुदिन्याचे पणामुळे येत नाही.
उपयोग : पुदिन्याची ताजी हिरवी पाने मुख्यतः चटणीसाठी वापरतात. इतर खाद्यपदार्थात सुगंघ येण्यासाठी वापरतात. व्हिनेगर, जेली, थंड पेये, मध इ. मध्ये पानांचा उपयोग करतात.
पुदिन्याची पाने शामक (शांत करणारी), वायुनाशी व आकडीरोधक आहेत. त्यापासून शामक चहा करतात. त्यापासून मिंट जुलेप नावाची दारू तयार करतात. पानांचा काढा साखर किंवा गूळ घालून लहान मुलांच्या विकारासाठी पिण्यास देतात. गर्भारपणात होण्याऱ्या वांत्या उन्माद या पानांमुळे शमतो. ताप व श्वासनलिकेतील दाह कमी होतो. डाबरच्या/पुदिन हरा या पोटदुखी व अजीर्णावरील औषधात पुदिना हा एक घटक आहे.
पुदिन्याला फुले आली कि फुलासह त्याचे बाष्पीभवन करतात. त्यापासून ०.२५ ते ०.५० टक्के बाष्पनशील (व्हॉलेटाईल) तेल मिळते. त्याला 'स्पीअरमिंट ऑइल' म्हणतात. हे तेल रंगहीन,पिवळ्या किंवा हिरवट पिवळ्या रंगाचे असते. त्याला पुदिन्याचा सुवास व चव असते. तेल जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्याला अधिक चांगला सुवास येतो. ह्या तेलाला अमेरिकेत चांगली मागणी आहे. त्याचा उपयोग च्युइंगम, टूथ पेस्ट, कन्फेक्शनरी व औषधात करतात. भारतामध्ये मात्र ह्या तेलाचा फारसा औद्योगिक उपयोग करीत नाहीत.
धान्यातील किडीवर प्रभावी कीटकनाशक
साठविलेल्या धान्यात (तांदूळ, गहू, मका, ज्वारी इ.) लाल तपकिरी रंगाचे बारीक (४ मी.मी. लांब सोंडे सापडतात. ते धान्याचे इतके नुकसान करतात की धान्य खाण्यास निरुपयोगी होते. कश्यप व त्यांचे सहकारी ह्यांनी केलेल्या प्रयोगात (१९७४) पुदिन्याच्या वाळलेल्या पानांची भुकटी करून ती १०० भाग गव्हात ०.५, १ व २ भाग मिसळली. तेव्हा १०० टक्के सोंडे मेलेले आढळले. तेव्हा पुदिन्याचे पानांचा हा नवीन उपयोग आपल्या फायद्याचा आहे.
पुदिन्यासाठी डॉ. बावसकर तंत्रज्ञान कल्पतरू : लागवडी पुर्वी जमिनीत साधारण १० गुंठ्यासाठी २० ते ३० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. त्यानंतर प्रत्येक कापणीनंतर १० किलो याप्रमाणे कल्पतरू खताचा वापर करावा.
बेणे प्रक्रिया : लागवडीच्या वेळी पुदिन्याच्या काड्या (काश ) ह्या जर्मिनेटर १०० मिली + १० लि. पाणी या द्रावणात ५ ते १० मिनिटे बुडवून लागवड करावी म्हणजे काड्या लवकर रुजून (पांढरी मुळी फुटून) फुट वाढीस लागते आणि लागवड यशस्वी होते.
फवारणी :
१) पहिली फवारणी : पुदिन्याच्या वाढीसाठी लागवडीनंतर १० ते १२ दिवसांनी जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : फुट वाढून पाने मोठी हिरवीगार रसरशीत होण्यासाठी वरील फवारणीनंतर ८ ते १० दिवसांनी जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १५० लि.पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
म्हणजे पुदिन्याची जोमाने वाढ होऊन लवकर २५ ते ३० दिवसात पहिल्या कापणीस येतो. कापणी झाल्यानंतर २ ते ३ दिवसांनी वरीलप्रमाणे पहिली फवारणी व दुसरी फवारणी त्यानंतर ८ ते १० दिवसांनी करावी. म्हणजे कापणी झालेल्या पुदिन्याची डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारणीने फुट जोमाने वाढीस लागून तो देखील २० ते २५ दिवसात कापणीस येऊन त्याचे ही उत्पादन वाढून विषमुक्त, दर्जेदार पुदिना मिळतो. असे प्रत्येक कापणीनंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या व कल्पतरू खताचा (एकरी ५० किलो) वापर करावा. साधारणपणे गड्डी बांधता येईल अशी ५ ते ६ इंच वाढ झाली की कापणी केली जाते. पुदिन्याला शहराजवळील मार्केटमध्ये चांगली मागणी असते.
डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवरील शेतकऱ्याचा अनुभव : डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने पहिली कापणी १ ते १। महिन्यात होऊन पुढील कापण्या १८ ते २१ दिवसाला होतात, असा अनुभव श्री. वसंतराव काळे, महंमदवाडी रोड, हडसर, पुणे - ४११०२८. फोन. ०२०-२६८२४२३८ यांनी कळविला आहे.