ऊसाची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ऊस हे एक महत्त्वाचे नगदी पीक असून या पिकामुळे ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक परिस्थितीत आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. उसाखालील क्षेत्रामध्ये भारत जगाच्या तुलनेत आघाडीवर आहे. ऊस ही भारतात तसेच दक्षिण आशियातील इतर देशांत प्राचीन काळापासून लागवडीत असलेली एक बहुवार्षिक गवताची जात आहे.

सहकारी साखर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण, दवाखाने, प्रशिक्षण कार्यक्रम, पाणीपुरवठा इ. विकासाच्या बाबींमध्ये तसेच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन इ. पूरक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जमीन : भारी अथवा मध्यम मगदुराच्या गाळाच्या व चांगल्या निचर्‍याच्या जमिनी या पिकास योग्य असतात. एक मीटर खोल असलेली भारी जमिनी आणि त्याखाली मुरमासारखा पाण्याचा चांगला निचरा होऊ देणार्‍या पदार्थांचा थर आणि जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ असेल तर ती जमीन उसासाठी उत्तम असते.

हवामान : हवामानातील तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि सुर्यप्रकाश या घटकांचा या पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होते असतो. जास्त थंडी किंवा थंडीच्या लाटीचा उसाच्या वाढीवर परिणाम होतो असतो. जास्त थंडी किंवा थंडीच्या लाटीचा उसाच्या वाढीवर परिणाम होतो. लवकर उगवणीसाठी वातावरणातील ताम्मान १० डी. सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. वाढीच्या अवस्थेत उसाला २५ डी. ते ३५ डी. से. च्या दरम्यान तापमान, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता व चांगला सुर्यप्रकाश उपयुक्त ठरतो.

पुर्व मशागत व खत : पहिली नांगरट २० -२५ सेमी खोल करवी. पहिल्या नांगरटीनंतर निदान १५ दिवस जमीन तापू द्यावी. नंतर एकरी २० बैलगाड्या शेणखत आणि १५० ते २०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत देऊन नंतर मोठ्या बांधणीच्या वेळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी एकरी १०० ते १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे.

ऊस लागण : ऊस पिकाची लागण बाराही महिने असली तरी प्रामुख्याने लागणीचे तीन प्रमुख हंगाम आहेत.

१) आडसाली हंगाम - आडसाली उसाची लागवड जुलै -ऑगस्ट महिन्यात केली जाते. हा ऊस १६ ते १८ महिने शेतात राहतो. अलिकडे पाऊसमान कमी झाल्यामुळे आणि उसाला वेळ, श्रम, पाणी, निविष्ठा जादा लागत असल्याने आडसाली लागण जवळ जवळ बंद झाली आहे.

२) पुर्व हंगाम - पुर्व हंगामी उसाची लागण सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात केली जाते. हा ऊस १४ ते १५ महिने शेतात राहतो.

३) सुरू हंगाम - सुरू हंगामी उसाची लागण डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात केली जाते. हा ऊस १३ ते १४ महिने शेतात राहतो.

बेणे निवड - ऊस लागवडीसाठी बेणे निवडताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी.

बेणे जाड, रसरशीत व निरोगी असावे. डोळ्यांची वाढ चांगली झालेली असावी. डोळे फुगीर असावेत, ते जुनाट व निस्तेज नसावे. बेण्यासाठी १०ते ११ महिने वयाचा ऊस वापरावा. बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे. डोळ्यांजवळ मुळ्या फुटलेला, पांगशा फुटलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये. बेण्यासाठी खोडवा ऊस वापरू नये.

बेणे प्रक्रिया : उसाचे बेणे जर्मिनेटर १ लि. + १ किलो प्रोटेक्टंट + १०० लि. पाणी या द्रावणात ५ ते १० मिनिटे बेणे (कांड्या) भिजत ठेऊन नंतर लागण करावी.

उसाची रोपे

कोल्हापूर तसेच ऊस पीक मोठ्या प्रमाणात करणार्‍या भागामध्ये जर्मिनेटरची वरीलप्रमाणे बेणेप्रक्रिया करून १ डोळा पद्धतीने पिशवीमध्ये रोपे तयार केली जातात. ४ x ५ इंचाच्या पिशवीला दोन होल पाडून पोयटा मातीने अर्धी पिशवी भरून त्यावर जर्मिनेटरची प्रक्रिया केलेली उसाची कांडी डोळा वरच्या बाजूला राहिल अशा पद्धतीने आडवी लावून त्यावर शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत मिश्रीत पोयटा माती टाकून कांडी झाकून त्यावर पाणी दिले जाते. जर्मिनेटरच्या वरीलप्रमाणे बेणेप्रक्रीयेने १०० % डोळ्यांना ३ -४ थ्या दिवशी कोंब बाहेर आल्याचे अनुभव आहेत. या रोपांना ८ व्या दिवशी जर्मिनेटरची प्रति १० लि. पाण्यास १५ ते २० मिली प्रमाणे फवारणी घेतल्याने रोपांना काळोखी येते. १ महिन्याच्या आत रोप १ ते सव्वा फुटाचे होते. (संदर्भ - श्री. सचिन शांतीनाथ पाटील, (बी. कॉम) चिंचवड, ता. करवीर, जि. कोल्हापूर. मोबा. ९२२५८०३८३१)

ज्या वेळेस शेत ऊस लागवड करण्यास अगोदरच्या पिकामुळे १ ते १।। महिना उशीरा रिकामे होणार असते, त्यावेळी लागवड उशीरा होण्यामुळे ऊस उत्पादनामध्ये अडचणी निर्माण होतात. तेथे अशी सशक्त रोप लावून लागवड यशस्वी होते. त्याचबरोबर १ ते १।। महिना ऊस पिशवीत वाढत असल्याने थेट शेतात कांड्यापासून लावलेल्या उसापेक्षा पाणी, खत, मशागत, वेळ, खर्च वाचतो.

महारष्ट्राच्या अनेक साखर कारखान्याच्या प्रक्षेत्रावर, शेतकर्‍यांच्या बेणे प्लॉट, ऊस उत्पादन क्षेत्रावर जर्मिनेटरचा वापर बेणे प्रक्रियेस करोन व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून पारंपारिक पद्धतीने उत्पादन घेतल्यापेक्षा २।। ते ३ पट (७० ते १०० टन एकरी) उत्पादन काढत आहेत.

लागवडीचे प्रकार :

१) ओली लागवड : ही लागवड सरीमध्ये पाणी सोडून टिपरी (बेणे) पायाने दाबून केली जाते.

२) कोरडी लागवड : पनिया देण्यापुर्वी टिपरी सरीमध्ये पुरली जातात आणि नंतर पाणी सोडतात.

३) एक डोळा लागवड : ही पद्धत प्रचलित झाली असून यामध्ये बेणे एक डोळ्याचे तयार करून पिशवीमध्ये रोपे तयार करून लागवड करतात.

४) दोन डोळे लागवड: या पद्धतीत दोन डोळ्यांच्या टिपर्‍यांची लागवड करतात.

५) पट्टी पद्धत (जोड ओळ) : या पद्धतीमध्ये उसाच्या दोन ओळींमध्ये साधारणपणे ५ ते ७ फुटाचा पट्टा सोडून लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. त्याची ऊस वाढीस मदत होते. तसेच लागवडीनंतर २ -३ महिन्यात येणारे आंतरपीक मधल्या पट्ट्यामध्ये घेता येते.

आंतरपिके : साधारणपणे सुरू हंगामातील (डिसेंबर ते फेब्रुवारी) उसामध्ये उन्हाळी भुईमूग, मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू अशी पीक येतात . तर पुर्व हंगामी (सप्टेंबर ते नोव्हेंबर) उसामध्ये हरभरा, गहू, लसून, गोट कांदे ही पिके घेता येतात. आडसालीमध्ये उडीद, मूग, चवळी, मटकी, हुलगा ही कडधान्य पीके घेत येतात. त्यामुळे या अंतरपिकांपासून उत्पन्न मिळून उसाचा लागवडीचा खर्च भरून निघतो.

तसेच या आंतरपिकाचा हिरवळीच्या खतासाठीही उपयोग करता येती. त्यासाठी प्रामुख्याने खरीपामध्ये उडीद, मूग, चवळी, मटकी, हुलगा, रब्बीमध्ये हरभरा, गहू, सातू, जवस, उन्हाळ्यामध्ये भुईमूग व पालेभाज्या ही पिके घेऊन दीड ते दोन फुट झाल्यावर साधारण फुलोर्‍यात येण्यापूर्वी कापून उसाच्या सरीमध्ये गाडावे. त्यामुळे खताच्या मात्रेमध्ये बचत होते आणि यामुळे उसाची वाढ होऊन कांड्यामधील अंतर वाढून वजनदार ऊस मिळतो. शिवाय पट्टा पद्धतीमुळे एकाच बेचक्यामध्ये आलेले उसाचे फुटवे एकसारखे जाड २० ते २५ कांड्यापर्यंतचे मिळतात. त्यामुळे निश्चितच उत्पन्नात (टनेजमध्ये) वाढ होते.

उसाच्या सुधारीत जाती :

१) को - ७४० : तिन्ही हंगामात लागवडीस योग्य जात असून भरपूर फुटवे, साखरेचे प्रमाण मध्यम, पाण्याच्या ताणास प्रतिकारक्षम आहे. खोडव्यास उत्तम, ऊस लोळला तरी मोडत नाही, हा ऊस उशिरा पक्क होत असून सरासरी हेक्टरी १२५ टन उत्पादन मिळते.

२) को - ७२१९ (संजिवनी) : ही जात सुरू व पुर्व या दोन्हीही हंगामात लागवडीस योग्य. याचा ऊस लोळतो पण मोडत नाही. पाण्याच्या ताणास संवेदनशील असून गाळपास लवकर येते. या वाणाचे सरासरी हेक्टरी १३० टन उत्पादन मिळते.

३) को. एम. - ७१२५ (संपदा) : ही जात सुरू हंगामात लागवडीस योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी, सर्व प्रकारच्या जमिनीसाठी योग्य (संपदा) गुळासाठी चांगली व खोडव्यासाठी उत्तम आहे. मध्यम उशीरा तयार होणारी असून हेक्टरी सरासरी ११० टन उत्पादन मिळते.

४) को - ७५२७ : ही जात सुरू, हंगामासाठी योग्य असून, पक्कता दीर्घकाळ टिकते.पाण्याच्या ताणास काही प्रमाणात प्रतिकारक्षम असून पक्कता मध्यम कालावधीत होते. हेक्टरी सरासरी ११० टन उत्पादन मिळते.

५) को.एम.- ८८१२१: ही जात तिन्ही हंगामात लावण्यास योग्य असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी तसेच खोडव्यासाठी चांगली आहे. मध्यम, उशीरा काळावधीत पक्क होत असून हेक्टरी सरासरी १५५ टन उत्पादन मिळते.

६) को - ८०१४ : ही जात सुरू व पूर्व हंगामात लावता येते. खोडव्यासाठी चांगली असून सातारा, सांगली व कोल्हापूरसाठी शिफारस केली जाते. लवकर पक्क होणारी जात असून हेक्टरी सरासरी १३५ टन उत्पादन मिळते.

७) को - ८६०३२ : ही जात तिन्ही हंगामात लागवडीस योग्या जात असून ऊस लोळत नाही, गुळासाठी चांगली, पाण्याच्या ताणास प्रतिकारक्षम असून लवकर पक्क होते. हेक्टरी सरासरी १४० टन उत्पादन मिळते.

८) VSI - ४३४ : या जातीची लागवड तिन्ही हंगामात करता येते. काणी, गवताळ रोगास प्रतिकारक असून साखरेचे प्रमाण अधिक आहे. मध्यम काळावधीत पक्क होते असून हेक्टरी १५५ ते १६० टन उत्पादन मिळते.

९) फुले सावित्री - ९४०१२ : या जातीची लागवड तिन्ही हंगामात करता येते. खोडकिड, शेंडे मर, काणी, तांबेरा रोगास बळी पडत नसून साखरेचा उतारा जास्त आहे. लवकर पक्क होते असून हेक्टरी १३५ ते १४० टन उत्पादन मिळते.

१०) २६५ : ही जात ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून विकसित केली असोन ऊस हिरवट रंगाचा जाड, उंच होतो. क्षारयुक्त जमिनीतही लागवड यशस्वी होते . पाण्याचा तन सहन करते. १७ -१८ महिने शेतात राहिला तरी दाशी पडत नाही. खोडवा चांगला येतो. फुटवे अधिक फुटतात. तिन्ही हंगामात लागवडीस योग्य असून आडसाली लागणीचा ऊस ३ ते ३।। किलो, पुर्व हंगामी २ ते २।। किलो तर सुरूचा २ किलो वजनाचा ऊस होतो. उत्पादन ८६०३२ पेक्षा २० - २५% जादा मिळते. रिकव्हरी (साखरेचा उतार) मात्र थोड कमी आहे.

पाणी व्यवस्थापन : ऊस बारमाही पीक असल्याने वर्षभर पाणीपुरवठा असणे जरूरीचे आहे. पिकाची वाढ व गरज लक्षात घेऊन पाणी दिले तर उसाच्या पिकाला बारा महिन्यांसाठी पावसासह प्रत्यक्ष शेतात एकूण २५० हेक्टर सें. मी. पाणी पुरेसे होते.

पीक संरक्षण : उसावर विविध रोग आणि किडी येतात. अधिक उत्पादनासाठी त्यांचा वेळेवर बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

उसावरील रोग व त्यावरील उपाय -

१) चाबूक काणी : चाबूक काणी हा रोग युस्टिलॅगो सायटॅमिनी बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होते. हा रोग उसाचे को - ७४० या जातीवर जास्त प्रमाणत आढळतो. ऊस पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे रोगग्रस्त उसाचे शेंड्यातून चकचकीत चंदेरी रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर पडतो. लवकरच पट्ट्यावरील चंदेरी आवरण फाटते व आतील काळा भाग उघडा होतो. हा काळा भाग म्हणजे बुरशीचे बीजाणू होत. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी उसाचे डोळ्यावर पडतात. त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो. अशा तर्हेने रोग शेतात पसरतो. काणी रोगामुळे उसाची वाढ खुंटते, ऊस बारीक होतो, पाने अरुंद व लहान होतात, त्यामुळे उत्पादनात घट येते.लागवडीच्या उसापेक्षा खोडव्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.

या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे आणि हवेद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) रोग्रस्त उसाचा बेण्यासाठी वापर करू नये.

२) लागवडीच्या उसात काणी रोगाचा प्रादुर्भाव ५ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अशा उसाचा खोडवा घेऊ नये.

३)रोग प्रतिकारक वाणांचा वापर करावा.

४) ३ ते ४ वर्षानंतर बेणे बदलावे.

५)शेतात कणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा, संपूर्ण बेट मुळासकट उपटून काढावे व जाळून नष्ट करावे.

२) गवताळ वाढ : हा रोग मायाकोप्लाझ्मा नावाच्या विषाणूपासून होतो. याचे प्रमुख लक्षण म्हणजे उसाचे बुंध्याकडील बाजूस असलेल्या डोळ्यातून असंख्य फुटवे येतात व त्याला गवताच्या थेंबाचे स्वरूप येते. फुटवे रंगाने पिवळसर पांढरट असून त्याची पाने अरुंद व लहान असतात. हा रोग बेण्याद्वारे, ऊस कापणीच्या कोयत्याद्वारे आणि मावा किडीद्वारे पसरतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) लागवडीसाठी नोरीगी बेण्याचा वापर करावा.

२) उष्णजल किंवा बाष्पउष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.

३) रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.

४) मावा किडीद्वारे ठेवू नये.

५) मावा किडीद्वारे या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे मावा किडीचे किटकनाशकाद्वारे नियंत्रण करावे.

६) रोगप्रतिबंधक वाणांची निवड करावी.

७) शेतातील रोगग्रस्त बेटे मुळासकट काढून नष्ट करावीत.

३) गाभा रंगणे : गाभा रंगणे हा रोग कोलिटोट्रायकम फालकॅटम या बुरशीचे प्रादुर्भावामुळे होतो. सुरुवातीच्या अवस्थेत हा रोग ओळखता येत नाही, परंतु पावसाळयानंतर जेव्हा उसाची वाढ थांबून साखर तयार होण्याचे प्रक्रियेस सुरुवात होते तेव्हा या रोगाची लक्षणे दिसून येतात. रोगग्रस्त उसाचे शेंड्यापासून तिसरे अथवा चवथे पान निस्तेज पडून वाळते व नंतर पूर्ण शेंडा वाळतो. रोगग्रस्त ऊस लांबीतून उभा कापला असता आतील गाभा लाल झालेला आढळून येतो. त्यात अधून - मधून आडवे पांढरे पट्टे दिसतात. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात. अशा उसाला अल्कोहोलसारखा वास येतो. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा.

२) उष्णजल किंवा बाष्पयुक्त हवा प्रक्रिया देऊन तयार केलेल्या बेणे मळ्यातील बेणे नवीन लागवडीसाठी वापरावे.

३) लागवडीपूर्वी उसाचे बेणे कार्बेन्डिझम १०० ग्रॅम बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून लागवड करावी.

४) ऊस कापण्याचा कोयतासुद्धा निर्जंतूक करून घ्यावा.

५) रोग्रस्त शेतातील उसाचा कापणी शक्य तेवढ्या लवकर करवी. रोगग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये.

६) ऊस कापणीनंतर त्या शेतात नवीन ऊस लागवड करू नये. पिकाची फेरपालट करवी.

७) कापणीनंतर शेतातील पाचाट, वाळा, धसकटे इत्यादी जागेवरच जाळून नष्ट करवीत.

४)उसावरील मर : हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॅरमी व सेफॅलोस्पोरीयम सॅफॅरी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव देठ कुजव्या किंवा मुळे पोखरणार्‍या अळीच्या संयोगाने मोठ्या प्रमाणात होतो. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाची पाने पिवळसर व निस्तेज होतात आणि नंतर वळतात . शेवटी प्रादुर्भाव वाढल्यास ऊस पुर्णपणे वाळतो, पोकळ होतो व वजनाला हलका भरतो. मुळ्य कुजतात, ऊस अलगपणे उपटून येतो. ऊस कांड्याचे समान दोन भाग केलेल्या कांड्याचा आतील भाग करड्या रंगाचा व लालसर पडलेला दिसतो आणि बराचसा भाग तंतुमय झालेला दिसतो.

नियंत्रणाचे उपाय :

लागवडीपूर्वी जर्मिनेटर सोबत प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम किंवा कार्बेन्डिझम बुरशीनाशक १०० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून त्यात १० ते १५ मिनिटे ऊस बेने २ बुडवून लागवड करावी.

१) निरोगी बेणे वापरावे.

२) रोगट उसाच खोडवा ठेवू नये.

३) मुळे पोखरणार्‍या किडीचा बंदोबस्त करावा.

४) फेरपालटीची पिके घ्यावीत.

५) प्रादुर्भाव झालेल्या शेतातील बेणे वापरू नये.

६) रोगट उसाचे अवशेष गोळा करून त्यांचा नायनाट करवा.

५) पोक्का बोईंग (पोंगा कुजणे):

हा रोग फ्युजेरियम मोनिलीफॉरमी या बुरशीपासून होतो. पोक्का बोईंग याचा अर्थ शेंड्याजवळील पानाचा आकार बदलणे किंवा पोंगा कुजणे असा होतो. अलिकडे या रोगाची लागण महाराष्ट्रात दिसून आली आहे. पोक्का बोईंग रोगाची लक्षणे सर्वप्रथम पोंग्याजवळील पानावर दिसतात. सुरुवातीला देठाजवळ पाने पिवळी पडतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पानावर सुरकुत्या पडतात. पाने अंकुचित होतात आणि शेंडा व पोंगा कुजतो. उसाची वाढ खुंटते, कांड्या आखूड होतात. काही वेळेस फांद्याही फुटातात. उसाची पाने एकमेकात गुंतलेली असतात.

या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.

नियंत्रनाचे उपाय :

१) २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा २० ग्रॅम मॅन्कोझेब अथवा १० ग्रॅम कार्बेन्डिझम यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२) उशीर म्हणजे एप्रिल - मी मध्ये उसाची लागवड करू नये.

६) पायनापल अथवा अननस रोग : हा बुरशीमुळे होणारा रोग आहे. सेरॅटोसिस्टिम पॅराडॉंक्सा या बुरशीमुले उसावर हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने जमिनीद्वारे पसरतो. म्हणून ऊस लागवड झाल्यानंतर याचा प्रादुर्भाव आढळून येतो. क्वचितच जर उंदीरामुळे, किडीमुळे अथवा अवजारामुळे असास इजा झाली असेल तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव उभ्या उसावर दिसून येतो. रोगजंतू इजा झालेल्या भागांवर शिरकाव करून उभ्या उसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास रोगग्रस्त बेणे उगवत नाही. कारण रोगजंतू कांडीतील अन्नांश स्वत:साठी उपयोगात आणतात. त्यामुळे उगवणीवर विपरीत परिणाम होतो. प्रादुर्भाव झालेल्या ऊसाकांडीचे निरीक्षण केले असता कांडी वजनाला हलकी व करड्या रंगाची होऊन कुजलेल्या अवस्थेत दिसते. कांडीचे उभे दोन भाग केल्यास आतील भाग गडद लाल ते काळ्या रागाचा झालेला दिसतो. आतील तंतुमय भाग मोकळा होऊन कांडी पोकळ होते. कांडीवरील डोळे कुजतात. त्यामुळे उसाची उगवण होन नाही आणि उगवण झाली तर ते रोप जास्त काळ जगत नाही. उगवलेल्या उसात रोगाची तीव्रता वाढल्यास प्रथम पाने वाळतात व नंतर संपूर्ण रोप वळते. रोगट उसाचे कांड्याचा वास अननस फळाच्या वासासारखा येतो. म्हणून याला 'अननस रोग' म्हणतात. हा रोग मुख्यत्वेकरून खोलवर लागण केल्यास किंवा पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनीत ऊस लागण केल्यास आढळतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) निरोगी बेणे वापरावे.

२) लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डिझम बुरशीनाशक अथवा १०० ग्रॅम बेलेटॉंन बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात १० मिनिटे बुडवून लागवड करावी.

३) उसाची खोल लागवड करू नये.

४) जमीन निचरायुक्त असावी.

७) केवडा : उसावरील केवडा हा रोग लोह या अन्नद्रव्याचे कमततेमुळे दिसून येतो. गावठाण किंवा पांढरीच्या जमिनीत तसेच पोयट्याच्या जमिनीत याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. कारण अशा जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे लोह या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी असते. त्यामुळे उसावर केवडा रोग दिसून येतो. रोगाचे सुरुवातीला उसाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडू लागतात. प्रथम पानाच्या शिराकडील भाग पिवळा पडतो. नंतर शिरांचा हिरवेपणा नष्ट होऊन संपूर्ण पान पिवळे होते. पीक निस्तेज दिसू लागते. प्रादुर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्याने पाने पूर्णपणे पांढरट होतात आणि केवड्याच्या पानाप्रमाणे दिसू लागतात. रोगग्रस्त उसाची उंची कमी असते. खोडव्यामध्ये सुरूवातीपासून याचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

नियंत्रणाचे उपाय :

१) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या थ्राईवर १ लि., प्रिझम १ लि., प्रोटेक्टंट १ किलो सोबत हार्मोनी ३०० मिलीची २०० लि. पाण्यातून खालून वरून पानांवर दाट फवारणी करवी. असे १ ते २ फवारण्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.

२) हिरवळीची पिके घ्यावीत.

३) गंधकयुक्त खताचा वापर करवा.

३) चुनखडीयुक्त जमिनीत उसाची लागवड करू नये.

उसावरील खोड किडीचे व्यवस्थापन : उसावर ४ प्रकारच्या खोड किडी येतात. त्यावर खोड किडा, शेंडा खोड किडा, दोन कांड्यामधील खोड किडा व मुळाजवळील खोडावर येणारा खोड किडा ह्या आहेत.

खोड किडा ही उसाचे उगवणीनंतर मोठ्या बांधणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडकिडीचा प्रादुर्भाव उगवणीनंतर झाल्यास ऊस मरतो. वाळलेल्या पोंग्यावरून ही कीड ताबडतोब ओळखता येते. सुरू असला फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. उसाची लागवड फेब्रुवारीच्या पुढे केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडीचा पतंग वैरणीच्या रंगाचा असतो. मादी पतंग पानाच्या खालील बाजूस पुंजक्यात अंडी घालते. अंडी लांब गोलाकार सपाट व एका रेषेत घालत असून त्यांचा रंग पांढरा असतो. मादी पतंग ३०० ते ४० अंडी घालते. अंडी उबविण्यासाठी ३ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो. अंड्यातून बाहेर आलेल्या आळीचा रंग पिवळसर पांढरा असतो व तिच्या अंगावर जांभळ्या रंगाचे पाच पट्टे असतात. अळी अवस्था नुकसान करणारी असून तिचा कालावधी २२ ते ३१ दिवसांचा असतो. कोषाचा रंग पिवळसर तपकिरी असून कोषाचा कालावधी ५ ते ९ दिवसांचा असतो. कोष जमिनीलगत पोंग्यात असतो. पतंगाचा कालावधी ४ ते ५ दिवस असतो.

खोडकिडीचा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी ३५ ते ५१ दिवस लागतात.

नुकसानीचा प्रकार : अंड्यातून बाहेर पडलेली अळी १७ ते १८ तास पानावर फिरते. नंतर ती उसाच्या सुरळीतून अगर जमिनीलगत असलेल्या खोडात शिरते आणि आतील भागावर उपजिवीका करते. त्यामुळे उसाचे पोंगे वळतात व मूळ ऊस मरतो. त्याबरोबरच उसाला फुटवे फुटतात. फुटव्यावरसुद्धा ही अळी उपजिवीका करते. खोडकिडीमुळे ऊस उत्पादनात २२ ते ३३%, साखर उतार्‍यात १२ % व गुळाच्या उत्पादनात २७% घट येते.

व्यवस्थापनाचे उपाय :

१) ऊस लागवड फेब्रुवारीनंतर करू नये.

२) ऊस लागवड करताना जर्मिनेटर बरोबर प्रोटेक्टंट या आयुर्वेदिक किटकनाशकाचा बेणे प्रक्रियेसाठी वापर करावा.

३) ऊस उगवणीनंतर ऊस ४५ दिवसांचा झाल्यावर बाळबांधणी करावी म्हणजे खोडकिडीने निर्माण केलेली छिद्रे बंध होतील व पतंग बाहेर पडण्याचा मार्ग बंद होईल.

४) खोडकिडीची अंडी व किडग्रस्त भाव अळ्यासह गोळा करून नष्ट करावा.

५) खोडकिडीची अळ्या ऊस तोडणीनंतर खोडक्यात राहतात, म्हणून ऊस तोडणी नंतर लगेच नांगरणी करावी व अळ्या गोल करून नष्ट कराव्यात.

६) ऊस उगवणीनंतर पाचटाचे ५ टन प्रती हेक्टरी आच्छादन करावे म्हणजे खोडकिडीचया अळ्यांना खोडामध्ये जाताना अडथळा होईल.

७) २५ कामगंध (फेरोमोन) सापळे प्रती हेक्टरी लावावेत.

८) खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अंड्यावरील परोपजीवी कीटक ट्रायकोग्राम चिलोनीस हेक्टरी ५० हजार प्रमाणे दर १० दिवसाच्या अंतराने ४ ते ६ वेळा सोडावेत.

९) उसाची लागवड करताना सरीमधून कार्बारील दाणेदार हेक्टरी २५ किलो द्यावे.

१० ) उसाची लागवड झाल्यानंतर २१ दिवसांनी अथवा खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येताच प्रोटेक्टंट २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची पातळी १५ टक्के गाभेमर आहे. गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी.

११) खोडकिडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा.

१२) उसाची तोडणी जमिनीलगत करवी.

लोकरी माव्याचे व्यवस्थापन : जगात लोकरी माव्याच्या सिरटोव्हॅक्यूना लॅनिजेरा, सिराटोव्हॅक्यूना ग्रामिनम व सिरटोव्हॅक्यूना जापोनिका या तीन जातीआढळतात. त्यापैकी भारतातील उसावर सिरटोव्हॅक्यूना ग्रामिनम या जातीच्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. महाराष्ट्रामध्ये प्रथम सांगली जिल्ह्यात को.सी. ६७१ व को. ८६०३२ ह्या जातीच्या उसावर जुलै २००२ मध्ये लोकरी माव्याचा उपद्रव्य आढळून आला. त्यानंतर त्याचा प्रसार दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये वाढू लागला. ही कीड बाल्ल्यावस्थेत ४ वेळा कात टाकते, म्हणजेच चार रूपांतर अवस्थेतून जाते.

प्रथम बाल्यावस्थेतील ही कीड ०.७७ मि. मी. लांब ब ०.२७ ते ०.३८ मि.मी. रुंद पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असते. ही अवस्था अतिशय चपळ असून पोटाच्या मागील भागात दोन कॉरनिकल्स असतात. द्वितीय बाल्यावस्थेत कीड १.२३ मि.मी. लांब व ०.३० ते ०.४६ मि.मी. रुंद, तृतीय बाल्यावस्थेतील १.८३ मि.मी. लांब व ०.४६ ते १.०७ मि.मी. लांब रुंद व चौथ्या बाल्यावास्थेतील २.०१ मि.मी. लांब व ०.६५ ते १.२८ मि .मी. रुंद आढळते. साधारणपणे तिसर्‍या बाल्यावस्थेपासून किडीच्या पाठीवर पांढरे लोकारीसारखे तंतू दिसू लागतात. हे तंतू संरक्षणासाठी तयार केलेले मऊ कवच असते. हे कवच तयार करण्यासाठी लागणारे अमीनो आम्ल व नत्र कॉरनिल्समधून बाहेर टाकले जाते. बाल्यावस्था पानाच्या पाठीमागे प्रामुख्याने मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला स्थिरावलेली आढळते. प्रादुर्भाव वाढत गेल्याने पानाच्या इतर भागावरही दिसून येते.

प्रौढ अवस्थेतील कीड : चौथ्या अवस्थेनातर कात टाकून प्रौढ कीड बाहेर येते. प्रौढ कीड बाहेर येते. प्रौढ काळ्या रंगाचे, २.०९ मि. मि. व ०.४७ ते ०.७८ मि. मी. रुंद असतात. पाठीवर पारदर्शक रुंद पंखाच्या २ जोड्या असतात. पंख २.७१ मि.मी. लांब व १.२१ मि.मी. रुंद असून पंखाखालील शिरा स्पष्टपणे दिसतात. प्रौढ अवस्थेतील किडीला दोन संयुक्त डोळे असतात. पोटाकडील भागात दोन कॉरनिकाल्स आढळतात. कॉरनिकल्स प्रौढापेक्षा बाल्यावस्थेमध्ये ठळकपणे आढळून येतात.

उपद्रव : माव्याचे तोंड सोंडेसारखे असून पुढील पायाच्या जोडीच्या मध्य भागात वाकलेले असते. सोंडेच्या आत सुईसारखा अवयव असतो. याद्वारे पानाच्या पाठीमागील पर्णरंध्रातून मावा रस शोधतो. पानाच्या अन्नवाहक नलिकेत मावा सुईसारखा अवयव खुपसून तोंडातील लाळ सोडतो व रसातील साखर अमिनो आम्ल व नत्रयुक्त पदार्थ शोषतो. पानाच्या अन्नवाहक नलिकेमध्ये नत्र व अमिनो आम्लापेक्षा साखरेचे प्रमाण जास्त असते. जास्तीत - जास्त नत्र मिळविण्यासाठी मावा रस जास्त शोषतो. शरीरास आवश्यक असणारी साखर घेऊन मधासारखा पदार्थ विष्टेवाटे बाहेर फेकला जातो. मावा पानाच्या खालील बाजूस असल्याने त्याने टाकलेली विष्टा खालच्या पानाच्या वरील बाजूवर पडते. त्यामुळे तेथील पानाच्या भागावर (गोड विष्टेवर) काळ्या रंगाची परोपजीवी (कॅप्नोडीयम) बुरशी वाढते. संपुर्ण पान काळे पडते व पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. किडग्रस्त पानांच्या मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला व पानांवर पिवळसर ठिपके दिसतात. प्रमाण वाढत जाऊन पाने ठिसूळ बनून पानांच्या कडा कोरड्या पडतात. नंतर पुर्ण पाने कोरडी पडून वाळतात. उसाची वाढ खुंटते. परिणामी ऊस उतपन्न व साखर उतार्‍यात घट येते.

ह्या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ हवामान थंड हवा, १९ ते ३५ डी. सेल्सिअस तापमान, ८० ते ९५% सापेक्ष आर्द्रता तसेच १००० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस अशा वेळी होतो.

प्रेजोत्यादन पिल्लांन थेट जन्म देऊन होते. पंख असलेली प्रौढ मादी व नराचे मिलन होते व २४ तासात १५ ते ३५ (जास्तीत जास्त ४३) पिल्लांना जन्म दिला जातो. या पिलांमध्ये मादी पिलांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी काळात मोठ्या प्रमाणात होतो.

नर व मादीच्या मिलनाशिवायही मादी पिल्लांना जन्म देते. या पिलांमध्ये नरांचे प्रमाण अधिक असते. ४ बाल्यावास्थातून मावा तयार होतो. साधारणपणे ६ ते २२ दिवात बाल्यावस्था पुर्ण होऊन १ महिन्यात ह्या किडींचा जीवनक्रम पुर्ण होतो.

या किडीच्या नियंत्रणासाठी : क्रायसोपरला कारनी हा परभक्षक मित्र किटक मऊ शरीराच्या किडीवर उपजीविका करतो. क्रायसोपरला कारनी किटकाची एकरी १००० अंडी किंवा अळ्या सोडाव्यात. किडीचा प्रादुर्भाव झाल्याझाल्या लवकरात लवकर सोडाव्यात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास कीड नियंत्रण त्वरीत होत नाही. त्यासाठी सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर पुढील प्रमाणे करावा.

बेणे प्रक्रिया : ऊस लागवडीपुर्वी बेणे प्रक्रिया गरजेचे आहे. त्यासाठी जर्मिनेटर १ लि.+ प्रोटेक्टंट १ किलो + १०० लि.पाणी या द्रावणात बेणे १० -१५ मिनिटे भिजत ठेवून लागण करावी. त्यामुळे उगवण एकसारखी, लवकर आणि पुर्ण होते. शिवाय बेणे प्रक्रियेत प्रोटेक्टंट या आयुर्वेदिक किटकनाशकाचा वापर केल्यामुळे सुरुवातीपासूनच लोकरी माव्यास प्रतिबंध होतो. ऊस उगवून आल्यानंतर मर किंवा काजळी काणी होऊ नये म्हणून एकरी जर्मिनेटर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो पाण्यातून सोडावे.

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर : उसाचे अधिक फुटवे निघून वाढ जोमाने होण्यासाठी तसेच कांड्याच्या संख्येत, जाडीत व लांबीत वाढ होण्यासाठी पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.



१) पहिली फवारणी : ( उगवणीनंतर २१ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर १ लि.+ थ्राईवर १ लि. + राईपनर १ लि.+ प्रोटेक्टंट १ लि. + १५० लि.पाणी. एकत्र मिसळून फवारावे.

२) दुसरी फवारणी : (पहिल्या फवारणीनंतर १।। ते २ महिन्यांनी ) : थ्राईवर १ लि. + राईपनर १ लि.+ प्रोटेक्टंट १ लि. + १५० लि.पाणी. एकत्र मिसळून फवारावे.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ३ ते ४ महिन्यांनी ) : थ्राईवर १ लि. + राईपनर १ लि.+ प्रोटेक्टंट १ लि. + १५० लि.पाणी. एकत्र मिसळून फवारावे.

तसेच एकरी जर्मिनेटर १ लि. २०० लि. पाण्यातून महिन्याच्या अंतराने ३ ते ४ वेळा सोडावे.

या फावराण्यांमुळे उसाचे फुटवे भरपूर फुटून पाने रुंद होऊन त्यावर लव तयार होते. त्यामुळे उसावर खराब हवामानाचा वाईट परिणाम होत नाही . तसेच फुटवे भरपूर फुटल्यामुळे जमीन पुर्ण झाकली जाते. एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हापासून होणारे बाष्पीभवन थांबते. जमिनीत ओलावा फार काळ टिकतो. परिणामी मध्यमा पाण्याच्या पाळ्यावरही उसाची वाढ चांगली होते. वरील फवारणीमध्ये उसासाठी क्रॉंपशाईनर या औषधाची गरज भासत नाही, मात्र तापमान जर ४२ ते ४४ डी. सेल्सिअसच्या वर गेले तर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे उन्हाळ्यात पाण्याच्या पाळीमधील अंतर वाढत असल्यास वरील फवारणीमध्ये 'क्रॉंपशाईनर' औषध १ लिटर ते १।। लिटर घेऊन फवारणी करावी.

अति पावसाने कोल्हापूर, सांगली भागातील उसाची पाने पिवळी पडतात, पाने फाटतात. पाने कडेने सडू लागतात, शेंडावाढ थांबते. अशा परिस्थितीत जर्मिनेटर, थ्राईवरसोबत 'क्रॉंपशाईनर' १ ते १।। लि/ १५० ते २०० लि. पाण्यातून फवारावे.

पक्वता व तोडणी : ऊस पाक्क होण्यासाठी थंड आणि कोरडे हवामान लागते. म्हणून ऑक्टोबर नंतरच ऊस पक्क होऊ लागतो. सर्वसाधारणपणे उसाच्या पक्कतेची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसतात. उसाची पाने पिवळी पडणे, उसाच्या कांड्यांवरील डोळे फुगणे, ऊस कांड्यावर मोडणे, उसाची टिपरी एकमेकांवर आपटल्यास धातूसारखा खणखणीत आवाज येणे, उसास चीर पाडून उन्हात ठेवल्यास साखरेचे कण चमकणे, ब्रिक्सचे प्रमाण १९ पेक्षा जास्त येणे, वाढे जुळून येणे.