दोडका व टोमॅटोसाठी खर्च कमी, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर नामी

श्री. रमेश प्रभाकर गाडेकर,
मु.पो. हिवरे तर्फे नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे


मी बी. कॉम. पर्यंत शिकलेला एक तरुण शेतकरी असून बारावी पासून शेती करीत आहे. मी मागील वर्षी दोडका लागवड सव्वा एकर मध्ये केली होती. दोडका या पिकाचा शेंडा चालत नव्हता. पाने पिवळी पडू लागली होती. त्या रोगासाठी मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार नारायणगाव शाखेतून पंचामृत औषध आणले. थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी ५० मिली आणि किटकनाशक याप्रमाणे फवारणी दोडका पिकावर केली. त्यामुळे आलेला रोग गेला व तीन तोडे एकदम चांगले निघाले. लक्षात आले की पुन्हा थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर चे स्प्रे घ्यावा व तो घेतला. पुन्हा दोडका लांब व सरळ निघाला. उत्पन्न चांगले निघाले. साधारण तेव्हा सर्व खर्च १५,००० रु. झाला होता. उत्पन्न ४५००० मिळाले होते. त्या अनुभवावरून या वर्षीच्या टोमॅटो पिकासाठी हे तंत्रज्ञान वापराचे ठरविले.

टोमॅटो १ एकर, लागवड - ७ एप्रिल २००४

पहिला तोडा झाला तो जुनच्या ९ तारखेला. तोडा होईपर्यंत तीन वेळा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नारायणगाव शाखेतील विक्री प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार स्प्रे घेतले. जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ३० मिली आणि किटकनाशक घेऊन पहिला स्प्रे केला. परत थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ७० मिली + राईपनर ३० मिली + किटकनाशक यांचा दुसरा स्प्रे केला त्यानंतर थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १०० मिली + राईपनर ५० मिली प्रति पंपास प्रमाण घेऊन फवारले. आजच्या तारखेपर्यंत ८५० कॅरेट गेलेत. जवळपास सर्व खर्च (पंचामृतसह) २५,००० रु. झाला व उत्पन्न ९५,००० रु. झाले. त्यानंतर डॉ.बावसकर सरांच्या प्रतिनिधींनी माझ्या प्लॉटला भेट दिली. मला त्यांनी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ७० मिली + क्रॉपशाईनर ७० मिली + तसेच त्यांचे नविन संशोधन केलेले प्रिझम नावाचे औषधे ५० मिली घेऊन फवारण्यास दिले. हा स्प्रे दिल्यानंतर आज २४/७/२००४ रोजी टोमॅटोचा शेंडा पुन्हा १ ते १।। फुटाने वाढला आहे. फुल व फळ भरपूर आहे. अजून अंदाजाचे २५० ते ३०० कॅरेट माल निघेल. म्हणजे सर्वसाधारण अजून ५००० रुपये खर्च करून आजचा भाव टोमॅटोला मिळाला तर पुन्हा ५०,००० ते ५५,००० रु. मिळतील अशी अपेक्षा आहे. हे केवळ डॉ.बावसकर सरांच्या तंत्रज्ञानानेच घडून येत आहे. कारण माझ्या बरोबरीचे प्लॉट केव्हाच संपले आहेत. माझ्या प्लॉटमध्ये २५० ते ३०० कॅरेटचा माल शिल्लक आहे.