जर्मिनेटरमुळे टोमॅटो बियांची १००% उगवण
श्री. विष्णु शिंदे,
मु. पो. जानेगाव, ता. केज, जि. बीड
मी टोमॅटो नामधारी एन. एस. ८१५ व एन. एस. २५३५ या दोन जाती गुरुकृपा कृषी सेवा व सल्ला केंद्र,
केज यांच्याकडून विकत असताना 'कृषी विज्ञान' मासिक माझ्या पाहण्यात आले. मी पंचामृताचा
वापर सुरुवातीपासूनच करण्याचे ठरविले. यासाठी मी जर्मिनेटर विकत घेतले. मी घरी बियाणे भिजविण्यासाठी
पुडी फोडताना माझ्या पत्नीने जर्मिनेटर औषध पाहिजे. तेव्हा तिने विचारले, हे काय आणखी
नविन औषध आणल? तेव्हा ती तिला म्हणालो, एन. एस. ८१५ ची पुडी, तु तुझ्या जुन्या पद्धतीने
टाक. मी एन. एस. २५३५ जर्मिनेटर औषधामध्ये भिजवून टाकतो. त्यावेळेस बी टाकल्यानंतर
आम्हांस असे आढळून आले की, मी जर्मिनेटर औषधाच्या द्रावणात भिजवून टाकलेल्या एन. एस.
२५३५ टोमॅटो वाणाची १००% उगवण झाली. माझ्या पत्नीने टाकलेल्या एन. एस. ८१५ या टोमॅटो
वाणाची ७५ - ८०% उगवण झाली. जर्मिनेटरमुळे लवकर व १००% उगवण झाल्याचा अनुभव आला. यावरून परत दोंन्ही वाणांची रोपे जर्मिनेटरमध्ये
बुडवूनच शेतात लावली. मी सर्वांना सांगू इच्छितो की, कोणतेही बियाणे वाफ्यावर टाकण्या
अगोदर जर्मिनेटरमध्ये भिजवून मग वाफ्यावर टाकावे.