जर्मिनेटरमुळे टोमॅटो बियांची ५ व्या दिवशी पुर्ण उगवण

श्री. गणेश जोशी,
मु.पो. बेलापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर


मी दि. १५/०१/२००४ रोजी पाटील कृषी सेवा केंद्र, श्रीरामपूर येथे टोमॅटोचे बियाणे घेण्यासाठी गेलो. माझ्या बरोबर माझा मित्र श्री. फरगडे बियाणे घेण्यासाठी आला होता. आम्ही दोघांनी पाटील सरांशी चर्चा करून बियाणे एन. एस. २५३५ घेतले. मी जर्मिनेटर १०० मिली घेतले पण फरगडे यांनी जर्मिनेटर घेतलेच नाही. मी घरी गेल्यावर एक ग्लास पाण्यामध्ये जर्मिनेटर ३० मिली घेतले. त्यामध्ये टोमॅटोचे बी टाकले. ३ तास पुर्णपणे भिजविले. नंतर बी सावलीमध्ये पुर्णपणे सुकविले. नंतर ४ इंचावर रेघा मारून अर्धा अर्धा इंचावर एक एक बी टाकले. पॉप्युलर प्लस हे जैविक सेंद्रिय खत पहिले टाकून घेतलेले होतेच. जर्मिनेटरमध्ये बी भिजविल्याने मला हे जाणवेल की, रोपांचा पाचव्या दिवशी पूर्णपणे उतारा झाला. नंतर मी श्री. फरगडे याचेकडे गेलो असताना त्याचा दिवशी त्याच्या रोपांचा उतारा फक्त ५०% झाला होता. मग मी त्याला माझे रोप दाखवून सांगितले की, बियाणे खरेदी करण्याअगोदर प्रथम डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे जर्मिनेटर आणून ते बिजप्रक्रियेसाठी वापर. त्यामुळे बियांची उगवण एकसारखी, लवकर होऊन रोपांची मर होत नाही.

मी माझ्या रोपावर वाढीसाठी व रोप सुद्दढ होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर व प्रोटेक्टंट) दोन फवारण्या घेणार आहे व टोमॅटो लागवडीनंतर पण पंचामृताच्याच फवारण्या घेणार आहे. मी तर लोकांना असे सांगेन की शेतकऱ्यांचे अमृत म्हणजे पंचामृत.