जाळ्यातील टोमॅटो पाहून दलाला आकर्षित होत

श्री. विलास काळू शेजवळ,
मु.पो. वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी, जि. नाशिक


वाडीवऱ्हे या गावामध्ये टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली होती. मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे मॉडेल प्लॉट पाहून पंचामृत औषधांचा वापर करावयाचे ठरविले. आम्ही मागील वर्षी एन. एस. उत्सव टोमॅटो लागवड केली. बियाणे जर्मिनेटर २० मिली आणि ग्लासभर पाणी या द्रावणात ३ - ४ तास भिजवून सावलित सुकवून फोकल तर उगवण ९९% झाली. रोपे सुद्धा जर्मिनेटरमध्ये बुडवून लावली. रोपांची मर अजिबात झाली नाही. रोपांची गळ पडली नाही. थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५०० मिली + १०० लि. पाणी + ६ ग्रॅम स्ट्रॅप्टोसायक्लीन अशी फवारणी केली. टोमॅटोचा थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५०० मिलीची १०० लि. पाण्यातून दुसरी फवारणी केली. झाडाची वाढ व फुटवा वाढायला सुरुवात झाली. तिसरी फवारणी वरील प्रमाणातच केली. अशा फवारण्या दर १० दिवसाच्या अंतराने केल्या. फुले जास्त प्रमाणात आली. आमच्या आणि शेजारच्या प्लॉटमध्ये खुप फकर होता. त्याच्या पेक्षा फुटवा व फुलकळी जास्त प्रमाणात होती. झाडांची उंची छाती इतकी झाली होती. घुबडया रोगाचा त्रास आमच्या प्लॉटमध्ये झाला नाही. चौथी फवारणी पंधरा दिवसांनी केली. यावेळेस क्रॉपशाईनरबरोबर राईपनर ५०० मिल व प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम /१०० लि. पाणी अशी केली. झाडांवर टोमॅटोचे प्रमाणे दुप्पटीने जास्त दिसत होते. पाने रुंद व निरोगी झाली. नागअळी आली नाही. ज्यावेळेस टोमॅटो मार्केटमध्ये नेण्यास सुरुवात केली. त्यावेळेस आवक मोठ्या प्रमाणात होती. आम्ही मार्केटमध्ये टोमॅटोच्या जाळ्या नेल्या की माल पाहून दलाल आकर्षिक व्हायचे व पटकन मालाची विक्री व्हायची, शिवाय इतरांपेक्षा जाळीमागे १० ते १५ रु. जास्त मिळायचे. टोमॅटोचे फळ मोठे होते व चकाकी चांगली होती. त्यामुळे माल पडून राहत नव्हता. अर्धा एकर टोमॅटोमध्ये साधारण पहिल्या खुड्याला (तोड्याला) २५ ते ३० कॅरेट निघत होते. जस जसे खुडे वाढत गेली. १२५ ते १५० कॅरेट या प्रमाणे भाव मिळत गेला. एकंदर ६ ते ८ खुडे झाले. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या करून हे शक्य झाले. टोमॅटोचा खर्च वजा करून ६० ते ६२ हजार रूपये उत्पन्न मिळाले.