१८ गुंठे टोमॅटोत १ लाख ३८ हजार केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळेच शक्य
श्री रामनाथ गेणू नेहे,
मु.पो. सावरगाव तळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
३६९ वाणाच्या टोमॅटोची १८ गुंठ्यात लागवड १५ मे २००४ ला केली. बिजप्रक्रियेपासून जर्मिनेटरचा
वापर केला. कल्पतरू खत ५० किलोच्या २ बॅगा टाकले. पंचामृत १ लिटरचे ३ सेट नेले. टोमॅटोवर
६ फवारण्या केल्या. जमीन भुरकट, पाणी कमी, विहीर बोअरचे आहे.
लागवडीनंतर २२ - २३ दिवसांनी करपा आला होता. तो पंचामृत फवारणीने गेला. नंतर नियमित फवारणी घेतल्याने पुन्हा रोग किड आली नाही. टोमॅटोचा फुटवा भरपूर होता. एका झाडाला २५० फळे होती. लागवड ४' x २' वर होती. एकाआड एक सरीवर लागवड केली. ओळीतील अंतर ४ फुट आणि २ रोपातील अंतर २ फुट होते. लागवडीनंतर १८ दिवसांनी नांगराने सारी फोडली व कल्पतरू खत आणि गांडूळखत १० गोण्या सरीमध्ये टाकून नंतर रिजरने मातीची भर लावली. १०:२६:२६ ची, १, १८:४६ ची १ आणि १९:१९ ची १ बॅग खत ३० - ३५ दिवसांचे पीक असताना दिले. ५५ दिवसात टोमॅटो चालू झाली. पहिल्या तोड्याला ३९ जाळ्या निघाल्या. १२५ ते १५० ग्रॅमच्यावर फळाचे वजन होते. त्यामुळे संगमनेर, अकोला, राहाता तालुक्यातील शेतकरी प्लॉट पाहण्यासाठी येत होते. दिवाळी नंतर १० दिवसांनी झाडे काढली. तोपर्यंत चालू होती. तोडा दिवसाआड करत होतो. एकूण १६६० जाळ्या निघाल्या. संगमनेर मार्केटला पाठवित होतो. १ लाख ३८ हजार रुपये झाले सुरुवातीला २५० रु. जाळीला भाव मिळाला नंतर सरसराई १२० ते १५० रु. मिळाला. शेवटी ८० रु. ने भिजवून टाकले. ऊसाची टिपरी जर्मिनेटरमध्ये बुडवून लागण केली. जून महिन्यात लावला, तो ५- ६ व्या दिवशी उगवला. दुसऱ्या प्लॉटमधील ५ गुंठे लागवडीला जर्मिनेटर शिल्लक नसल्याने वापरले नाही. तर त्याची १५ दिवसांनी उगवण झाली आणि जोमही बीजप्रक्रिया केलेल्या उसापेक्षाही कमी आहे.