अति पावसातही माझ्या टोमॅटोने पाडला पैशाचा पाऊस

श्री.नितीन मुरलीधर आहेत,
मु.पो. सांगवी, ता. चांदवड, जि. नाशिक


मी २ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या पंचामृत औषधांचा वापर करत आहे. या वर्षी टोमॅटो २५३५ ची लागवड करण्याचे ठरविले. बियाणासाठी जर्मिनेटर या औषधाची बीजप्रक्रिया केली असता उगवण १००% झाली. मर व रोप गली पडले नाही, नंतर १.५ x २.५ फुट फुट अंतरावर लागवड केली. लागवडीनंतर आठ दिवसांनी पंचामृत औषधाची पहिली फवारणी केली, त्यामुळे वाढ, फुटवा झपाट्याने झाला. लागवडीनंतर १८ दिवसांनी नांगराने सरी काढली नंतर रिजरने मातीची भर लावली. १०:२६:२६ व १५:१५:१५ खताची एक एक बॅग ३० - ३५ दिवसाचे पीक असताना दिली, या वर्षी श्रावण महिन्यामध्ये पाऊस जोरात चालू झाला आणि मला असे वाटायला लागले की, आता या पावसात आपला टोमॅटोचा प्लॉट टिकणार नाही, कारण सलग ८ ते १० दिवस पाऊस असल्यामुळे आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांचे टोमॅटोचे प्लॉट सततधार पावसामुळे संपुर्ण निकामी झाले. फक्त माझ्या एकट्याचा प्लॉट वाचला आणि शेतकरी वर्गाला आणि मला एक चमत्कार पहायला मिळाला. सर्व शेतकरी मला विचारपुस करत होते की, तू कोणत्या औषधांची फवारणी केली. मी त्यांना सांगितले डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीची पंचामृत औषधे सुरुवातीपासून फवारली. झाडाला घेर व फळाला ठणकपणा व साईज पण चांगली मिळाली आहे. आता प्लॉट चालू झाला आहे. सध्या लासलगांव मार्केटमध्ये १५० ते १७५ रु. भाव असताना आम्हाला २०० ते २२५ भाव मिळत आहे.