अवकाळी पाऊस गारपीटीने ३ एकर उद्ध्वस्त टोमॅटो प्लॉट दुरुस्त होऊन ८ ते ८।। लाखाचे उत्पन्न

श्री. विष्णु बंडू खांडबहाले,
मु.पो. महिरावणी , ता.जि. नाशिक.
मो. ७५८८५१५०४४


मी मागील ६ वर्षांपासून माझ्याकडे असलेल्या द्राक्ष बागेसाठी डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.

१२ फेब्रुवारी २०१० ला ३ एकर टोमॅटोची लागवड केली. मागील वर्षी फयान वादळात द्राक्ष बाग सापडली. १।। एकर द्राक्ष बाग काढून त्या ठिकाणी १।। एकरात अभिनव जातीची टोमॅटो व दुसऱ्या १।। एकरात नामधारी ५०१ जातीची टोमॅटो लावली.

टोमॅटोची रोपे नेटाफेमची इनलाईन ड्रिप करून मल्चिंग पेपरचा वापर करून लावली. सुरुवातीस जर्मिनेटरचा रोपे लागवडीच्यावेळी १० लि. पाण्यात १०० मिली जर्मिनेटर या प्रमाणात वापर केला. त्यामुळे टोमॅटोची वाढ चांगली झाली. फळे लागलेल्या अवस्थेत मे २०१० ला अवकाळी पाऊस झाला. गारपीट झाली. त्याने पुर्ण झाडांना जखमा होऊन पाने पुर्णपणे फाटून गेली होती. टोमॅटोची फुले - फुळे पुर्णपणे गळून गेली होती. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत मी डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीच्या नाशिक शाखेत जाऊन जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५ लि. घेऊन आलो. टोमॅटोचा प्लॉट उद्ध्वस्त झालेला असतानासुद्धा हार न मानता माझ्या ३ एकर टोमॅटो प्लॉटसाठी २०० लि. पाण्यामध्ये सप्तामृत प्रत्ययेकी १ लि. या प्रमाणत ५ दिवसांच्या अंतराने दोनच फवारण्या केल्या. त्याने फुलकळी निघून जसेच्या तसे झाड पूर्ववत झाले. पाहिल्यासारखाच फ्रेशपणा प्लॉटमध्ये दिसायला लागला. अडीच फूट ते तीन फूट उंचीची झाडे झाली. टोमॅटो फळांची संख्या १०० ते १२५ पर्यंत प्रत्येक झाडावर दिसू लागली. पाने रुंद हिरवीगार झाली. फुटवा मोठ्या प्रमाणात झाला. अवकाळी पावसात सापडलेले टोमॅटो प्लॉट बाकीच्या लोकांनी काढून टाकले.

तीन एकरात आठ ते साडे आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ५०० रु./क्रेट याप्रमाणे दर मिळाला. ४ ते ५ महिने टोमॅटो चालू होते.