पावसाने गेलेल्या, पाने सडलेल्या टोमॅटोचा प्लॉट पंचामृत व प्रिझमने सुधारला

श्री. रामनाथ डक्षु सानफ,
मु.पो. सोनेवाडी खुर्द, ता. निफाड, जि. नाशिक


मी दि. ३ जून २००४ रोजी १८ गुंठ्यामध्ये २५३५ टोमॅटोची ३' x २' अंतरावर लागवड केली. डॉ. बावसकर सरांची पंचामृत औषधे गेली ४ ते ५ वर्षपासून वापरीत आहे. २ पाकिटे बियांसाठी ४ ते ५ वर्षापासून वापरीत आहे. २ पाकिटे बियांसाठी ३० मिली जर्मिनेटर + २५० मिली पाण्यात ३ - ४ तास भिजवून नंतर काढून सावलीत सुकवून वाफ्यात टाकले. उगवण एकदम ९९% झाली. रोपांवर जर्मिनेटर व थ्राईवर प्रत्येकी ४० मिलीची दर १० दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारणी केल्यामुळे रोपांवर तजेलदारपण व तरतरीत रोपे तयार झाली. पुनर्लागणीच्या वेळेस बादलीमध्ये १० लि. पाणी जर्मिनेटर २५० मिली घेऊन रोपे बुडवून लावली. रोपे जोमदार वाढून मुळ्यांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. मर अजिबात झाली नाही. नंतर मुसळधार पाऊस चालू झाला. १० - १५ दिवस रोज पाऊस असल्यामुळे पंचामृत औषधाची फवारणी करायला जमले नाही. त्यामुळे टोमॅटोच्या झाडांची वाढ झालीच नाही आणि टोमॅटोच्या झाडाला एकही पान राहिले नाही. फक्त काड्या राहिल्या होत्या. मला कळून चुकले होते की, हा प्लॉट आता टिकणार नाही. पण मी जेव्हा ६ ऑगस्ट २००४ रोजी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी नाशिक ने टोमॅटो व कांदा पिकावर परिसंवाद आयोजित केला होता तेव्हा त्यांनी त्यांच्या एका नवीन औषधाचे म्हणजे 'प्रिझम' हे औषध त्याच दिवसापासून मार्केटला आणले. तेव्हा या 'प्रिझम' औषधाबद्दल डॉ.बावसकर सरांची भरपूर माहिती दिली. मी लगेच 'प्रिझम' औषध घेऊन गेलो. प्रिझम ५०० मिली + बुरशीनाशक + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली आणि चार दिवसांनी पाहिले तर फुट जबरदस्त दिसू लागली. मला प्रिझम या औषधाने आश्चर्यचकित करून टाकले. नंतर पंचामृतची फवारणी केली तर पत्ती एकदम रफसफ झाली. कुठलाही रोग नाही. आता टोमॉटोचा प्लॉट सुरू आहे.