महिनाभर पावसात राहूनही टोमॅटोची झाडे सतेज, रोगमुक्त, दर्जेदार उत्पन्न

श्री. दत्तात्रय नामदेव वाजे,
पांढुर्ली, ता. सिन्नर, जि. नाशिक


आम्ही २ एकर २५३५ नामधारी टोमॅटोची लागवड केली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या उत्पादनांचा वापर करण्याचे ठरविले. बिजप्रक्रिया करताना जर्मिनेटर ३० मिली/२५० मिली पाण्यात ३ ते ४ तास बियाणे भिजत ठेवले. एका वाफ्यात बियाणे टाकताना जर्मिनेटरचा वापर केला नव्हता त्या वाफ्यात ५०% च उगवण झाली. इतर वाफ्यात उगवण १००% झाली. मुळ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे थोठ्या कट करून जर्मिनेटर २५० मिली/१० लि. पाणी बादलीमध्ये घेऊन टोमॅटो मुळ्या बुडवून लावल्या. वाढ जोमदार झाली. १५ दिवसांनी जर्मिनेटर + थ्राईवर प्रत्येकी ५०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. फुटवा चांगला मिळाला. झाडे निरोगी झाली. वरील फवारणीनंतर दर १५ दिवसांनी जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि./२०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. महिनाभर सतत पाऊस चालू असूनसुद्धा रोपे जशीच्या तशी राहिली. फुटला, काडी भरपूर होती. झाडांवर घुबड्या, व्हायरस नव्हता. फुलकळी जोरात होती. झाडांवर घुबड्या, व्हायरस नव्हता. फुलकळी जोरात होती. पावसात आमचा प्लॉट साडेतीन फुट (कंबरेएवढा) वाढला होता. फळांची संख्या भरपूर वाढत जात २०० पर्यंत जाळी माल निघायचा.