२० ते २५ रु./१० किलो दर असूनही १० गुंठे टोमॅटोचे ३० हजार रुपये
श्री. धनाजी मारुती कोडीतकर,
मु.पो. नांदेड, ता. हवेली, जि. पुणे
१० गुंठे इंडम लागवडीपासून माल संपेपर्यंत आठवड्यातून एकदा पंचामृत फवारणी करत असे.
कल्पतरू न वापरल्याने ४ - ५ गाड्या शेणखत वापरले. तर रोज ३०० किलो माल १।। महिना सतत
निघाला. महिनाभर दर २० ते २५ रु. १० किलो असूनही ३० हजार रु. झाले. सर्व खर्च १० हजार
झाला. पंचामृताचाही खर्च कमीच झाला. माल लागेपर्यंत दर आठवड्यास २०० - २५० रु. ची पंचामृत
फवारणी केली. फळ निर्मिती झल्यावर प्रोटेक्टंट न मिळाल्याने विषारी किटकनाशक अळीसाठी
वापरले. आमच्या येथे सुरुवातीपासून ऑगस्टपासून ते एप्रिलपर्यंत १ ते १।। लाख रुपये
होतात. ७ महिन्यात ३ टप्पे होतात. प्रत्येक टप्प्यात अर्धा महिना नविन फुटीसाठी जातो.
आमचे बंधु (नामदेव) आपल्या टेक्नॉलॉजीने पुर्ण कागडा शेवटपर्यंत करणार आहेत. आता सध्या
त्यांची वांगी चालू आहेत.