भर पावसात वाय गेलेली टोमॅटो रोपे सुधारली
श्री. प्रविण जनार्दन देशमुख, मु.पो. मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक
माझ्या टोमॅटोचा १ एकर प्लॉट असून नामधारी २५३५ अर्धा व ८१५ अर्धा एकर आहे. आमचे नातेवाईक
श्री. विजय देशमुख व किशोर देशमुख हे डॉ. बावसकर सरांच्या पंचामृत औषधांचा द्राक्ष,
टोमॅटोसाठी वापर करतात व तो रिझल्ट पाहून मी टोमॅटोसाठी पंचामृत औषधे वापरण्याचे ठरविले.
रोपांना गळ पडत होती. पाऊस मोठा होता. त्यामुळे वाफ्यावर रोपे खराब होऊन पावसाने प्लॉट
खराब होत चालला होता.
त्यावेळेस टोमॅटोची वाफ्यावर रोपे असताना जर्मिनेटर ३० मिली +
१५ लि. पाणी अशी दाट फवारणी केली. जर्मिनेटरची ड्रेंचिंगप्रमाणे फवारणी केल्याने रोपे
तरारून आली. एकही रोप वाया गेले नाही. नंतर ४ ते ५ दिवसांनी रोपे लावली. लागण केल्यानंतर
८ दिवसांनी थ्राईवर व क्रॉपशाईनर प्रत्येकी ४० मिली १० लि. पाण्यातून फवारणी केली.
फ्लॉवरसाठी याचप्रमाणे फवारणी केली. अर्धा एकरासाठी टोमॅटो व फ्लॉवरमध्ये पत्तीला काळोखी
आली. टोमॅटोमध्ये फुटवा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की, शेजारील प्लॉटपेक्षा १५ दिवस
अगोदरच प्लॉट आहे की काय ? असे वाटते. दुसऱ्या फवारणीसाठी थ्राईवर व क्रॉपशाईनर प्रत्येकी
५०० मिली/१०० लि. पाणी अशी आजच फवारणी केली. टोमॅटोचा प्लॉट इतरांपेक्षा सरस होणार
याबद्दल मला खात्री आहे.