जुने कांद्याच्या बियापासून २० गुंठे कांदा लागवडीतून ७० गोण्या कांदा १।। लाख

श्री. सचिन दिनकर बांगर,
मु.पो. रायतेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर.
मो. ९७६५८०२६१३



माझ्याकडे घरगुती जुने २ वर्षापूर्वीचे २ किलो कांद्याचे बियाणे होते. ते मी २ लिटर पाण्यामध्ये ५० मिली जर्मिनेटर घेवून ५ ते ६ तास भिजवून व नंतर सावलीत सुकवून वाफ्यामध्ये टाकले व त्याला सावली केली. ६० ते ७०% उगवण झाली. त्यानंतर जर्मिनेटर व थ्राईवरचे २ स्प्रे घेतले. त्यामुळे जळणी व मर झाली नाही. जे रोप ४५ दिवसात तयार होते ते ३० दिवसात लागवडीला आले. लागवड करताना रोपे पूर्ण जर्मिनेटरमध्ये भिजवून लागवड केली. त्यामुळे रोपे सतेज व टवटवीत झाली. खत म्हणून डी.ए.पी. १ बॅग, सुक्ष्म, अन्नद्रव्ये व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत एकत्र करून वापरले. पावसाचे ढगाळ वातावरण, दमट हवामान व अनियमीत पावसामुळे गाभ्यामध्ये मावा व शेंडे करपले होते. त्यासाठी थाईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + स्प्लेंडर २० मिली + १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केली. १५ ते २० दिवसात फरक जाणवला . परत तीच फवारणी रासायनिक किटकनाशकाबरोबर घेवून ३ ते ४ वेळा केली. पातीच्या पिळकुटीसाठी (पात पिवळी पडून वाकडी होणे यावर) थ्राईवर व क्रॉपशाईनचा उत्तम रिझल्ट आला. शेवटपर्यंत शेतात पिळकुटी दिसली नाही व कांद्याला पोसण्यासाठी व उत्तम कलर येण्यासाठी क्रॉपशाईनर, राईपनर व न्युट्राटोन तसेच बोरॉन, कॅल्शिअम, १३:००:४५ या सर्वांची फवारणी केली. पातीची मान जाड झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढली. ढगाळ व दमट वातावरणात सुद्धा पात रुंद व तेजदार राहिली. ऑकटोबरच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे सडून गेले. पण आपला प्लॉट टिकून राहिला व भिग्यामध्ये (२० गुंठे) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७० गोण्या कांदा निघून संगमनेरच्या मार्केटला बाजारभाव चांगला असल्यामुळे प्रति क्विंटल ४.५ ते ५ हजार रु. बाजारभाव मिळाला. अशा रितीने २० गुंठ्यांतून १ लाख ५० हजार रु. उत्पन्न मिळाले.