कमी पाण्यावरही ३० गुंठे कारले देई समाधानकारक उत्पादन
श्री. प्रकाश विश्वनाथ सनसे,
मु.पो. शहापूर, ता. जामनेर, जि. जळगाव- ४२४२०६.
मो. ९७३०१८४४९६
माझी ५० एकर जमीन आहे. त्यापैकी ३० गुंठे क्षेत्रावर मी महिको अमन - ३ वाणाचे कारले
१० x ३ फुटावर १४/२/२०१६ ला लावले. सुरुवातीला मी रासायनिक औषधांची फवारणी केली. त्यानंतर
मला आपल्या कंपनीचे प्रतिनिधी श्री. विजय गोसावी (मो. ७७०९७३७६०५) हे शेतावर भेटले.
त्यांनी मला आपल्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत औषधे व कल्पतरू खत यांची माहिती
दिली. सुरुवातीला कारल्याची मर होत असल्यामुळे ठिबकमधून ३० गुंठ्यासाठी जर्मिनेटर १
लिटर सोडले. त्यामुळे पाचव्या दिवशी मला फरक दिसून आला. मर थांबून वेलींचे फुटवे व
वाढ चांगली होऊ लागली. जर्मिनेटरमुळे मला १००% रिझल्ट मिळाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी
पुणे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी मला सप्तामृत औषंधाची फवारणी करण्यास सांगितले.
त्यानंतर श्री. विजय गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार फवारणीसाठी औषधे मागविली. कारले
या पिकावर मी सप्तामृतची दर १० दिवसांनी याप्रमाणे तीन वेळा फवारणी केली. त्यामुळे १००% फायदा
झाला व माझ्या कारल्याची ५२ दिवसात पहिली तोडणी झाली. तेव्हा ३५ किलो (वानोळा) माल
निघाला. ७ व्या दिवशी १ क्विंटलची तोडणी झाली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमुळे
माझ्या कारल्यांना मार्केटमध्ये शायनिंग व चमक असल्याने मागणी अधिक व चांगल्या दराने
लवकर विक्री होऊ लागली. यापुढे मी अजुन औषधे मागून दर ८ व्या दिवशी फवारणी घेऊन चांगले
उत्पादन काढणार आहे. ही कारली अजून १ ते १।। महिना चालतील.
या अनुभवातून मी शेतकरी बांधवांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करण्याचा सल्ला देत आहे.
या अनुभवातून मी शेतकरी बांधवांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करण्याचा सल्ला देत आहे.