१० एकर बीटी कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एकरी ८ - १० क्विंटल उतार अपेक्षीत

श्री. चांगदेव कोंडीबा गाडे, मु.पो. भाटेपूरी, ता. जि. जालना.
मोबा.९७६४३१३२१०


मी गेल्या ७ वर्षापासून व्यवसाय करत आहे. गेल्यावर्षी १६ जून २०१० ला बुलेट कंपनीचा कापसाचा जाकपॉट वाण, अंकुरचा जॉय, कृषीधनचा १४४ या ३ वाणांची लागवड केली होती. जमीन मध्यम प्रतीची असून पाणी पाटाने देत होतो. लागवड ४ x १॥ फुटावर होती. नेहमीप्रमाणे या कपाशीस रासायनिक खते औषधे वापरून उत्पादन घेतले. झाडावर १०० च्या जवळपास बोंडे होती. याची वेचणी नोव्हेंबर अखेरपर्यंत पुर्ण झाली. एकरी १० क्विंटल उतारा मिळाला.

फरदड उत्तम भाव ६४०० रुपये क्विंटल

नंतर डिसेंबर २०१० मध्ये कामानिमित्त पुण्याला आलो असता मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कापसाचे स्पेशल पुस्तक आणि कृषी विज्ञान मासिक घेतले आणि त्यातील माहिती वाचली. नंतर मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सर्व सप्तामृत औषधे कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथून मागवून घेतली आणि त्याच दरम्यान या कपाशीच्या खोडव्यासाठी (फरदड) वापर केला. नोव्हेंबर - डिसेंबर दरम्यान पुर्णपणे झाडांच्या काड्या झाल्या होत्या. अशा परिस्थतीत जर्मिनेटर, थ्राईवर व प्रिझमची फवारणी केली असता संपूर्ण जुना प्लॉट नवीन फुट होऊन हिरवागार झाला. जानेवारीमध्ये या झाडांना फुलकळी लागून ८० - ९० बोंडे लागली. या अवस्थेत राईपनर, न्युट्राटोनची फवारणी घेतली असता बोंडाचा आकार वाढून कापसाची प्रत एक नंबरची निघाली. याची वेचणी एप्रिलमध्ये संपली.कापसाची प्रत अतिशय चांगली मिळाल्याने हिंगणघाट मार्केटला ६४०० रू. क्विंटलला भाव मिळाला.

यापूर्वी आम्हाला फरदड (खोडवा) पिकापासून एवढे उत्पन्न कधीच मिळाले नव्हते. शिवाय यावेळेस या फरदडीच्या कापसाची प्रत लागणीच्या कापसाच्या तोडीची होती. सात एकरात फरदडपासून ६५ क्विंटल उत्पन्न मिळाले. त्याचे ४ लाख रू. मिळाले.

या अनुभवावरून चालू वर्षी कपाशी लागवडीपासूनच डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरणार आहे. रान तयार असून जूनच्या ७ तारखेपर्यंत ५ एकरमध्ये ४ x १ ॥ फुटावर अंकूर ३०३४, ५६४२ आणि २१६ या वाणांची लागवड करणार आहे. ९३० रू. ला बियाचे पाकिट (४५० ग्रॅम) मिळाले. एकरी पावणेदोन पाकिटे बी लागते.