डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ४ एकरात ३७ क्विंटल कापूस, आंतरपीक चवळीचे २२ हजार

श्री. नितीन यशवंत पाटील, मु.पो. गिधाडे, ता. शिरपूर, जि. धुळे,
फोन नं. (०२५६३) २५९२८२


माझी १२ एकर जमीन आहे. त्यातील ४ एकरमध्ये १७ मी २००४ ला कापसाची लागवड केली. बियाणे मारुती ९६३२ ची २ पाकिटे आणि सिंजेंटाची तेजा वाणाचे १ पाकिट बी घेतले होते. दोन्ही वाणांच्या बियाण्यांना जर्मिनेटरची (जर्मिनेटर ५० मिली + १ लि. पाणी + १३५० ग्रॅम बियाणे ) प्रकिया केली. ठिबक असल्याने ओळी ४॥ फुटावर असून दोन झाडातील अंतर ३ फुट ठेवले. जमीन काळी आहे. पाणी बोअरवेलचे आहे. लागवड करताना एका जागी एकच बी लावली, ते ९५% उगवण ४ थ्या दिवशीचा जाणवली. एरवी पारंपारिक पद्धतीने २- २ बी लावत असत. त्यामुळे महागडे बियाणे वाया जात होते. एकरी १ बॅगप्रमाणे कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केला. सप्तामृताची फवारणी बी उगवून आल्यानंतर ११ व्या दिवसापासून चालू केली. एकूण ५ फवारण्या केल्या.

३ -३ फुटाच्या मध्ये चवळीची लागवड केली आहे. त्यामुळे कापसाबरोबर चवळीलाही फवारणी बसत होती. गेल्यावर्षी (२००४) शेजारील व आमच्या भागातील बीटी कापसाची मर फार झाली. मात्र आमच्या शेतात एकही रोप मेल्याचे दिसते नाही. पात्या ४० - ५० दिवसापासून चालू झाल्या. पात्याही भरपूर लागल्या. गळ वगैरे काही नाही. बोंडे ९० दिवसात लागली. एका झाडावर १८० ते २०० बोंडे लागली. बोंडाचा आकार मोठा असून त्यात एकही किडके बोंड नव्हते. कापसाला ड्रीपने पाणी सकाळ - संध्याकाळ सुरुवातीला अर्धातास, नंतर झाडांची वाढ झाल्यावर बोंड पोसतेवेळी १ - १ तास दिवसातून २ वेळा देत होतो. साधारणपणे जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी देत होतो.

पहिली वेचणी १४० दिवसात झाली. बोंडे पुर्ण उमललेली होती. बियाणे कंपनीचे प्रतिनिधी प्लॉटवर आले होते. तर त्यांनाही आपलाच वाण आहे असे वाटत नव्हते. पाने लहान असून बोंडाची संख्या भरपूर व कापूस पांढराशुभ्र, पुर्ण उमललेला दिसत होता. तेव्हा त्यांना बियाणे खरेदी केल्याच्या पावत्या दाखविल्यावर विश्वास बसला. एकूण ४ वेचण्या केल्या. शेवटच्या वेचणीपर्यंत कापसाची क्वालिटी उत्तम मिळाली. त्याच वाणांचे दुसर्‍याच्या शेतात पीक पाहिले असता बोंडे कमी, आकारही कमी आणि धाग्याची प्रतही कमी होती.

आम्हाला ४ एकरात ३७ क्विंटल उतार मिळाला. याला २०५० पासून २३०० रू. पर्यंत क्विंटलला भाव मिळाला. वेचणी केल्यानंतर निधेल तेवढ्या कापसाची (१० - १२ क्विंटलप्रमाणे ) ताबडतोब विक्री करत असे. ४ एकरातील आंतरपीक चवळीपासून एकूण २२ हजार रू. मिळाले. ३ किलो बियाची लागवड केली होती. रोग किडीचा प्रादुर्भाव कमी, खर्च कमी असून उत्पन्न चांगले मिळाले. तसेच तुरीचा बेवडही फायदेशीर ठरला.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कापसानंतर ऊस

आता त्याच जमिनीत उसाची लागवड केली आहे. ऊस ६७१ वाणाचा आहे. कांड्या जर्मिनेटरचे द्रावणामध्ये भिजवून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात (२००४ ) लावला. एका डोळ्याला २० - २२ फुटवे आहेत. लागवड सरीपद्धतीने आहे. २ - २ डोळ्याच्या कांड्या लावल्या होत्या. ऊस ४० - ४५ दिवसाचा असताना पहिली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी केली आणि नंतर दुसरी फवारणी ७० -७५ दिवसांनी केली. एकरी ४ बॅगा कल्पतरू सेंद्रिय खताच्या लागवडीपुर्वी सरीमधून टाकल्या होत्या. सध्या ३ - ३॥ फुट उंचीचा ऊस आहे.