डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारल्याने ४ एकर बी टी कापूस व फरदडपासून ६५ क्विं. उत्पादन, दर ६ हजार रू./क्विंटल, ३ लाख निव्वळ नफा
श्री. गंगाराम आबाजी पंधारे, मु.पो.पाडळी, ता. शिरूर कासार, जि.बीड.
मोबा. ७७०९४८०७९४
माझ्याकडे गावशिवार पाडळी, ता. शिरूर कासार, जि. बीड येथे १३ ॥ एकर मध्यम निचरायुक्त
जमीन आहे. मी गेल्यावर्षीपर्यंत पारंपारिक पद्धतीने शेती करत असे. माझ्या मुलाचे आळंदी
येथे इलेक्ट्रिशियनचे दुकान आहे. त्यामुळे मी पुण्याला येत असे. एकवेळ बीड बसस्थानकावरून
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'कृषी विज्ञान' मासिक घेतले आणि वाचन केल्यानंतर पुण्याला मुलाकडे
आलो असता सहज गुलटेकडी मार्केटला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसला चौकशी करण्यासाठी
आलो. त्यावेळी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती घेऊन सप्तामृत २५० मिली घेऊन
गेलो. त्यावेळी मुलगा म्हणाल, "आण्णा तुम्ही हे कशाला उगीचच पैसे खर्च केले. आपली
पुर्वीपासून आलेली रासायनिक पद्धती चांगली आहे." त्यावर त्याला सांगितले, शितावरून
भाताची परिक्षा असते बाळ. एक वेळ फवारणी करून पाहू.
त्यावेळची परिस्थिती ढगाळ वातावरण असल्यामुळे करपा, मावा अशा रोग - किडीने आमचे भागातील कापूस पीक हातातून जाण्याच्या मार्गावर होते. मी गावी गेल्यानंतर एक महिन्याची कापूस लागवड असल्यामुळे १० लिटर पाण्यामध्ये २५० मिली पंचामृत फवारणी केली. लगेचच आठवड्यामध्ये फरक दिसून आला. नंतर मुलगा गावी आल्यानंतर त्याने पीक परिस्थिती पाहिल्यावर चकीत झाला. कारण इतरांचे कापूसपीक करप्यामुळे निस्तेज होते.
त्या अनुभवावरून त्याने गुलटेकडी (पुणे) येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमधून स्वत: २ लिटर सप्तामृत आणून दिले. सरांनी सांगितल्याप्रमाणे फवारण्या करत राहिलो. ४ एकरमध्ये सप्तामृताच्या रासायनिक किटकनाशक मिसळून ५ फवारण्या केल्या असता ४ एकर मध्ये ६५ क्विंटल कापूस मिळाला. गावामध्ये व्यापारी आले आणि ६ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे विक्री केली असता ३ लाख ९० हजार रुपये मिळाले. त्यामध्ये सर्व खर्च ९० हजार रू. आला. निव्वळ नफा दोन्ही सिझनच्या खरीप व रब्बी खोडव्यापासून (फरदड) ३ लाख रुपये मिळाला. यावरून आज सप्तामृत खरेदी करण्यास आलो आहे.
चालू वर्षी ६ एकरमध्ये जुलै २०११ ला ३ x ३ फुटावर लागवड केली आहे. बीटी वाण आहे. फुटवा, वाढ भरपूर असून ८० - ९० दोडी लागली आहे. पात्याही भरपूर आहेत. उन्हाने पाते गळ होऊ नये म्हणून तसेच बोंडांचे पोषण होण्यासाठी सप्तामृत फवारणीसाठी घेऊन जात आहे.
ता. क.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५ एकरात ७० ते ७५ क्विंटल कापूस तर फरदडपासून ३५ ते ४० क्विंटल उत्पादन अपेक्षित
गेल्यावर्षी प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून ४ एकरात मुख्यपीक व फरदडपासून एकरी १६ क्विंटल दर्जेदार उत्पादन निघाल्यामुळे ६ हजार रू. / क्विंटल मिळून ३ लाख रू. झाले होते. या अनुभवावरून चालू वर्षी जुलै २०११ मध्ये लावलेले बीटी ५ एकरातील कापसास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सुरूवातीपासून ४ फवारण्या केल्या तर फुटवा, वाढ भरपूर होऊन प्रत्येक झाडावर ८० ते ९० दोडी लागून फुलपात्या चालूच होत्या. एरवी उन्हाने पाते गळ होते. या अवस्थेत सप्तामृत औषधांची फवारणी घेतल्यामुळे गळ अजिबात झाली नाही. नंतर बोंडे पोसण्याच्या काळात २ फवारण्या घेतल्याने पोषण अतिशय चांगले झाले.
कापसाची वेचणी दिवाळीनंतर सुरू झाली. तर २ - ३ बोंडांच्या वेचणीतच गच्च मुठभर कापूस निघत होता. पुर्ण उमललेला पांढराशुभ्र कापूस मिळाला. एकूण ४ वेचण्या झाल्या आहेत. तर ५ एकरात ७० क्विंटल कापूस निघाला आहे. अजून ४ - ५ क्विंटल वेचणीचा कापूस बाकी आहे.
स्वतंत्र १ विहीर, २ बोअर आहे, पाणी भरपूर आहे. याच कापसास पुन्ह पाणी देऊन खोडवा धरला आहे. खोडव्याला १ फवारणी केली आहे. तर पाते भरपूर लागले आहे. या खोडव्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३५ ते ४० क्विंटल उत्पादन निघेल. या खोडव्यातच बाजरी, मका, हरभरा यांचे आंतरपीकही घेतले आहे. बाजरी गुडघ्याला लागत आहे. हरभरा खुरपणीला आला आहे. तर मका उगवत आहे.
सध्या (डिसेंबर २०११ ) कापसाचे भाव पडलेले आहेत. ४ हजार ते ४२०० रू. भाव चालू आहे. आम्ही कापूस साठवून ठेवला आहे. जानेवारी नंतर भाव वाढल्यावर विक्री करणार आहे.