दुष्काळी परिस्थितीत कापूस पिकाचे नियोजन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


जेव्हा मान्सुनचा पाहिला पाऊस मृग वा आर्द्रात (७ जून ते ४ जुलै ) पडतो तेव्हा कापसाची पेरणी सुरू होते. मात्र त्यानंतर पाऊस ताण देऊन दुष्काळी परिस्थितीचे सावट जेव्हा निर्माण होते. तेव्हा माणसांप्रमाणेच पिकेही पावसाची वाट पाहतात. अशा परिस्थितीत पेरलेल्या बियाची उगवण होते, मात्र पिकाला जगण्यासाठी पाणी न मिळाल्याने ती सुकू लागतात आणि ह्या पाण्याच्या पाळीतील अंतर वाढत गेल्यास पुर्ण प्लॉट जळून जाऊन दुबार पेरणीची वेळ येते. मात्र तीही पुर्णता पावसावरच अवलंबून असते.

कापसाचा शेतकरी हा मुळातच कर्जबाजारी असल्याने यातून बाहेर पाडण्यासाठी, आपल्या कुटूंबाची गुजराण (उदरनिर्वाह) करण्यासठी बियाणे कसेबसे आर्थिक अडचणीतून उपलब्ध करून उत्पादनाच्या आशेने पेरणी करतो. मात्र अशा परिस्थितीत निसर्गही त्याच्याकडे पाठ फिरवितो आणि परिणामी शेतकरी नाउमेद होतो.

अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी दुष्काळाचे सावट जाणवताच. कापसाची पेरणी थेट जमिनीत न करता कापसाची रोपे तयार करावीत. ते करत असताना कापसाचे बी ३० मिली जर्मिनेटर + २० ग्रॅम प्रोटेक्टंट + १ लि. पाण्यात १ किलो बी ४ -५ तास भिजवून नंतर बियाणे शेण काल्यात घोळून घ्यावे . सावलीत सुकवावे नंतर ४ x ६ किंवा ५ x ६, ५x ७ इंचाच्या पिशव्या घेऊन त्यांना दोन्ही बाजूला खालून १ इंच वर व वरून १ इंच खाली अशा -पद्धतीने २२ चमचे टाकावे. तसेच मातीमध्ये वरच्या थरात कल्पतरू सेंद्रिय खत १ चमचा साखरेच्या आकाराचा भरून टाकून त्या पिशव्या पाण्याने पुर्ण ओल्या कराव्यात. नंतर या पिशव्यांमध्ये वरीलप्रमाणे बीजप्रक्रिया केलेले बियाणे वरून १ ते १।। सेमीवर टोकावे आणि पिशवीला दिवसाआड झारीने पाणी द्यावे. असे केल्याने बियाची उगवण ७ -८ दिवसात पुर्ण झालेली आढळेल.

ही रोपे वड, पिंपळ, कडूनिंब, औदुंबर, रेन ट्री या वृक्षांच्या छायेखाली वाढवावीत म्हणजे हवा खेळती राहून उष्णतेचा परिणाम रोपांवर होणार नाही. ही रोपे अगवून आल्यानंतर त्यावर ४ -५ दिवसांच्या अंतराने २ वेळा सप्तामृत १ मिली आणि २ मिली प्रती लिटरप्रमाणे फवारणी पहिल्या १०दिवसांत करावी. नंतर ५ -६ दिवसांनी सप्तामृत फवारण्या कराव्यात. या रोपांना २ -३ दिवसाआड हलके पाणी द्यावे. अशा पद्धतीने ही रोपे १ फुटाची होईपर्यंत त्याच पिशवीत वाढू द्यावीत. नंतर चांगला पाऊस झाल्यावर तसेच जमिनीच्या ओळीची पुर्ण खात्री झाल्यावर आणि पाणी देण्याची सोय असल्यास त्यांची लागवड जमिनीत करावी. या परिस्थितीत देखील पाऊस न झाल्यास आणि पिशवी लहान पडू लागल्यास दुसर्‍या मोठ्या आकाराच्या पिशव्यांत रोपे स्थलांतरीत करावीत. या पद्धतीने कमी पाण्यावर पहिले १ ते २ महिने रोपे वाढविता येऊन हंगाम वाया न जाता प्रतिकूल परिस्थितीत या रोपांपासून उत्पादन घेता येते.

किती जरी दुष्काळी परिस्थिती असली तरी या पावसाळ्याच्या ३ ते ४ महिन्यात खानदेश, विदर्भ मराठवाडा या कापूस पिकविणार्‍या पट्ट्यात किमान ४ ते ८ पाऊस हमखास होतात. सरासरी १४ ते १८ इंच पाऊस हा होतच असतो.

अशा परिस्थितीत वरील पद्धतीने तयार केलेली रोपे चांगला एक पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा जातीपरत्वे उपलब्ध झाल्यावर संकरीत, सुधारित बीटी अथवा देशी वाण कोरडवाहू लागवडीतील अंतर ठेवून लागवड करावी. साधारणपणे हलक्या जमिनीमध्ये १।।' x २' - ३', २' x ३' तर भारी काळ्या जमितीत २।।' x ४' असे अंतर ठेवावे. या रोपांच्या भोवती मूग किंवा चवळीच्या ८ -१२ बिया परिघावर टोकाव्यात. म्हणजे या द्विदलवर्गीय पिकांमुळे जैविक नत्र कापसाच्या झाडास उपलब्ध होईल आणि रासायनिक खतात बचत होईल. तसेच ह्या पिकाच्या हिरवळीमुळे उष्ण हवा गाळून कपाशीच्या खोडाला गार झुळून लागून त्या गारव्यावर झाडे टवटवीत राहतात. तसेच या पिकांचे खोडाजवळ आच्छादन झाल्याने तेथील बाष्पीभवन न होता ओलावा जास्त काळ टिकेल. ही पिके ज्यावेळेस गुडग्याएवढी (१ महिन्याची) होतील आणि फुलार्‍यात येतील, तेव्हा कपाशीची झाडे मांडी, कंबरेएवढी झालेली असतील आणि ४० -५० फुलपात्या तर २० -३० कैर्‍या लागलेल्या असतील. या अवस्थेत आळ्यातील वरील आंतरपिकाचे कापून लहान - लहान तुकडे करून कापसाच्या झाडाभोवती आळ्यात गाडावेत. गाडतेवेळी त्यावर कल्पतरू सेंद्रिय खत ५० ग्रॅमपर्यंत द्यावे. म्हणजे हे हिरवळीचे पिकाचे अवशेष लवकर कुजू लागतील. जैविक नत्र, स्फुरद मिळेल आणि रासायनिक खतात बचत होऊन पिकाला नैसर्गिक हिरवळीचे सेंद्रिय खत उपलब्ध होऊन गांडुळांची संख्या वाढण्यास मदत होईल. या परिस्थितीतील कापसाला रासायनिक खते जमिनीतून अजिबात देऊ नयेत. रासायनिक खते द्यावयाचीच झाली तर विद्राव्य खताची अर्धा ते एक टक्का या अल्प प्रमाणात फवारणी २ ते ३ वेळा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान केंद्रावरील तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे करावी.

पिकांची परिस्थिती पाहून पाणी व्यवस्थापनासाठी वरील पद्धतीने लागवडीनंतर प्रत्येक झाडाजवळ अर्धा ते १ लिटरचे मातीचे गाडगे ठेवून त्यामध्ये लागेल तसे पाणी ४ -५ दिवसांनी भरावे. गाडग्यावर खापरीचे झाकण ठेवावे. ही पाणी देण्याची पद्धत ठिबक पेक्षा अत्यंत कमी खर्चाची असल्याने दुष्काळी परिस्थितीत याचा अवलंब करून मोठा आधार मिळेल.

या कापसाला अतिविषारी किटकनाशकांच्या फवारण्य करणे टाळावे. कारण या प्रतिकूल परिस्थितीत झाडांची प्रतिकारशक्ती त्यामानाने कमी असल्याने या झाडांवर या विषारी किटकनाशकांचा विपरीत परिणाम होईल. तसेच अशा पद्धतीने उत्पादित केलेल्या कापसास निर्यातीमध्ये अडथळा येईल म्हणून विषारी किटकनाशके वापरणे टाळावे.

अशा दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाटी पाण्याचा ताण सहन करण्यासाठी फुलपाती लागेपर्यंत लागवडीनंतर १५ दिवसांनी जर्मिनेटर २० मिली, कॉटन थ्राईवर २०मिली, क्रॉंपशाईनर २० ते ३० मिली, प्रोटेक्टंट २० ग्रॅम आणि प्रिझम २० मिलीची प्रति १० लि. पाण्यातून फवारणी करावी.

नंतर दुसरी फवारणी १५ ते २० दिवसांनी जर्मिनेटर २५ मिली, कॉटन थ्राईवर २५ मिली., क्रॉंपशाईनर ३०मिली., प्रोटेक्टंट २० ग्रॅम, प्रिझम २० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी करावी आणि तिसरी फवारणी पुन्हा २१ दिवसांनी कॉटन थ्राईवर ३० मिली., क्रॉंपशाईनर ४० मिली., राईपनर २० मिली, प्रोटेक्टंट २५ ग्रॅम, प्रिझम ३० मिली,न्युट्राटोन ३० मिली, हार्मोनी १५ मिलीची फवारणी १० लि. पाण्यातून करावी. म्हणजे एवढ्या ३ फवारण्यावर कापसाची कमी पाण्यावर समाधानकारक वाढ होऊन फुटवा अधिक होऊन फुलपात्या, कैर्‍या लागतील.

त्यानंतर बोंड लागतेवेळी कॉटन थ्राईवर ३० ते ४० मिली, क्रॉंपशाईनर ४० मिली, राईपनर ३० मिली, न्युट्राटोन ३० मिली, हार्मोनी १५ मिली, प्रोटेक्टंट ३० ग्रॅमची १० लि. पाण्यातून चौथी फवारणी करावी.

५ वी फवारणी बोंड पोसण्यासाठी कॉटन थ्राईवर ४० मिली, क्रॉंपशाईनर ५० मिली, राईपनर ४० मिली, प्रोटेक्टंट ४० ग्रॅम,न्युट्राटोन ५० मिल, हार्मोनी १५ मिलीची फवारणी १० लि. पाण्यातून करावी. तसेच फुलपाती लागल्यावर कल्पतरू खताचा प्रति झाडास ५० ग्रॅम याप्रमाणे डोस द्यावा.

वरील चौथ्या व पाचव्या फवारणीने तसेच कल्पतरू खताने लागलेल्या फुलापात्यांचे बोंडत रूपांतर होऊन बोंडे पोसातील. प्रोटेक्टंटच्या नियमित वापराने परागीभवन होऊन कीडप्रतीबंधक उपाय होईल. द्राक्षाप्रमाणेच कपाशीवरील मिलीबग्जला या आयुर्वेदिक प्रोटेक्टंट पावडरने प्रतिबंधक उपाय होतो. असे साक्री (धुळे) येथील औषधे वापरणारे डॉं. अरुण पाटील (M.Sc. Ph.D.) मॅथेमॅटिक्सचे लंडनमधील भारतीय प्राध्यापक (मोबा. ९८५०२३०३२४) यांचे अनुभव आहेत. त्यांची कपाशी सध्या ऑगस्ट २००८ च्या पहिल्या आठवड्यात छातीबरोबर असून फुलपात्या बोंडे १२० ते १५० या प्रमाणात लागलेली असून हा प्लॉट पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करत आहेत. डॉं. अरुण पाटील यांच्याप्रमाणेच श्री. सुभाष पाटील, टाकळी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव (मोबा. ९८६७९६३६३६) यांनी कपाशीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत वापरल्याने कपाशी सुदृढ असून पिठ्या ढेकून अजिबात नाही, असे फोन वरून कळविले आहे.

कॉटन थ्राईवरने फुटवा निघून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. क्रॉंपशाईनरने पानांना हिरवागारपणा येऊन प्रकाश संश्लेषणाचे कार्य सुधारते. न्युट्राटो, राईपनरने बोंडांचे पोषण होऊन लांब धाग्याचा पांढराशुभ्र कापूस मिळतो. या सर्व गोष्टी अनुकूल झाल्यास मे महिन्यातील लागवडीच्या कपाशीची पहिली वेचणी दसर्‍यास, नंतरची (दुसरी ) नोव्हेंबर २ -३ आठवडा व तिसरी वेचणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुर्ण होईल.

जून लागवडीची साधारण १५ दिवस ते १ महिना वेचणी उशीरा सुरू होऊन तिसरी वेचणी डिसेंबर १५ ते २५ चे दरम्यान पुर्ण होऊन सर्व कापूस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने 'ए' ग्रेडचा निर्यात योग्य उत्पादित होईल व परत कापसाचा खोडवा (फरदड) अथवा रबीचे गव्हाचे पीक घेता येईल.