तणनाशकाणे जळालेली कपाशी तंदुरूस्त होऊन फुलपात्या व कैर्या (बोंड) अधिक लागल्या
श्री. प्रभाकर काशिनाथ शिंदे, मु. पो. चिंचोली, ता. जामनेर, जि. जळगाव
मी अशिक्षीत शेतकरी असून माझी आर्थिक परिस्थिती फारच नाजूक आहे. यातून बाहेर पडण्यासाठी
मोठ्या उत्साहाने ३ जून २००८ ला ब्रह्मा आणि मल्लिका कापसाची २ एकरमध्ये लागवड केली.
जमीन भारी काळी असून लागवड ३ ॥ x ३ फुटावर आहे. या कापसाला लागवडीपुर्वी ३ ट्रोलि शेणखत
दिले. कपाशीची उगवण झाल्यानंतर किटकनाशकाची पहिली फवारणी केली. त्यानंतर कपाशी एक - दीड
महिन्याची असताना दुसरी फवारणीसाठी स्वत:चा स्प्रेपंप नसल्याने शेजारच्याकडून आदल्या
रात्री पंप आणून सकाळी फवारणी करण्यासाठी शेतावर गेलो. माझ्याकडे मागील वर्षाचे तणनाशक
शिल्लक उरलेले होते. ते मी एण्डोसल्फान (किटकनाशक) समजून कपाशीच्या झाडांवर फवारले.
त्यानंतर सर्व कपाशी सुकायला सुरुवात झाली. मी घाबरून शेजारच्या शेतकर्यांना बोलावले.
त्यांनी औषधाची बाटली हातात धरून, "हे तणनाशक आहे व ते तुम्ही फवारल्याने पीक सुकत
आहे," असे मला सांगितले. त्यानंतर यावर उपाय करण्यासाठी मी दुकानातून दुसरी औषधे आणून
फवारली. परंतु त्याचा काहीच परिणाम न होता झाडे अधिकच सुकून ती वाळू लागली. त्यानंतर
शेजारचे शेतकरी सांगू लागले की, आता तू ही कपाशी उपटून टाक आणि दुसरे पीक (कपाशी)
पेर. मी अगोदरच आर्थिक अडचणीत होतो. सुरुवातीच्या खर्चाचेच देणे पुर्ण झाले नव्हते.
अशात नवीन पुन्हा खर्चासाठी पैसे कोठून आणायचे ? मी निराश झालो. अक्षरश : रडू कोसळले.
काय करावे, काहीच सुचेना. कोणी काहीही सांगू लागले.
अशातच गावातील माझे मित्र श्री. शिवलिंग वाणी यांनी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे फवारण्यास सांगितली. २ - ३ फवारण्या घेतल्यास प्लॉट सुधारेल, असे सांगितले. ते हुशार आणि अभ्यासू आहेत. मात्र या परिस्थितीत मनस्थिती स्थिर नसल्याने चांगले काय आणि खराब काय हे उमगेना. अशातच काहीतरी केले पाहिजे म्हणून त्यांचा शब्द पाळून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत आणून पहिली फवारणी जर्मिनेटर, कॉटन थ्राईवर आणि क्रॉंपशाईनर पंपाला प्रत्येकी ६० मिलोप्रमाणे फवारणी केली.या फवारणीमध्ये अक्षरश: चमत्कार झाल्याचे जाणवले. सर्व मरगळलेल्या झाडांना (शेंडा पुर्णता वाळलेला असताना) खालील बाजूने नवीन फुटवे निघाले. त्यानंतर ४ दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी जर्मिनेटर, प्रिझम आणि कॉटन थ्राईवरची प्रत्येकी ५० मिली प्रति पंपाला घेऊन केली. त्याने फुटवे वाढू लागले. पाने प्रतिकूल परिस्थितीत हिरवीगार जाड, सतेज निघाली. या कपाशीची झाडे सध्या ४ फुटाची होऊन घेर तीन फुटाचा झाला आहे. याला २५- ३० बोंडे लागली असून फुलपाती चालूच आहेत. यावर रोग किडीचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच बोंडाचे पोषण होण्यासाठी तिसरी फवारणी जर्मिनेटर, कॉटन थ्राईव, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंटची केली आहे. अशा प्रकारे तणनाशाकाने जळालेली कपाशी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पुन्हा फुटून तुलनेने अधिक उत्पादनाच्या वाटेवर आहे. त्याची पाहणी करण्यासाठी मे. हरिओम कृषी सेवा केंद्र, चिंचोलीचे श्री. लक्ष्मण वाणी (आप्पा) आणि गावातील कापूस उत्पादक शेतकरी आले असता त्यांनी झाडाचा तणनाशकाने मेलेला शेंडा (वाढ जागेवरच थांबलेला) खुडून हातात दाखविताना घेतलेला फोटो मागील आवृत्तीत दिला होता. मृत झाडांना बाजूने फांद्या फुटून झाडे कंबरेला लागलेली दिसत आहेत.