जिरायती कपाशीची लागवड
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
जमीन : कपाशीची वाढ मध्यम ते भारी जमिनीत तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणार्या
जमिनीत चांगली होते. त्यामुळे उथळ, भरड जमीन, निचरा न होणारी जमीन आणि चोपण जमीन निवडू
नये. उथळ जमिनीत झाडांची वाढ खुजी राहून बोंडे कमी लागतात. निचरा न होणार्या जमिनीत
झाडांची वाढ अवास्तव होते. तसेच बोंडे कमी लागणे बोंडगळ यामुळे उत्पादन कमी येते.
बीजप्रक्रिया : १ लि. पाण्यामध्ये २५ मिली जर्मिनेटर घेऊन त्या द्रावणात १ किलो बियाणे ४ ते ६ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून लागवड करावी.
लागवड : पेरणी पाभरीने किंवा टोकन पद्धतीने करावी. पाभरीने पेरणी केल्यास दोन चाड्याची पाभर वापरावी. म्हणजे बियाणे व खत एकाच वेळी पेरता येईल. टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाणात बचत होते.
जिरायत कापसाची पेरणी मृग नक्षत्राचा पुरेसा पाऊस झाल्याबरोबर ७ जुलैपुर्वी करावी. पेरणी उशीरा झाल्यास उत्पादनात बरीच घट येते.
जाती :
१) देशी सुधारीत : या जातीचे दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी आणि दोन झाडातील २० ते २२ सेंमी अंतर ठेवावे. पेरणी पाभरीने करावी. एकरी ६ ते ८ किलो बियाणे पुरे होते.
२) अमेरिकन सुधारीत : या जातीचे दोन झाडांतील व दोन ओळीतील अंतर ६० सेंमी ठेवून पाभरीने पेरणी करवी. एकरी ४ ते ५ किलो बियाणे पुरेसे होते.
३) संकरित वाण : या वाणाची लागवड टोकण पद्धतीने करावी. लागवडीतील अंतर ६० x ९० सेंमी ठेवावे. एकरी सव्वा ते दीड किलो बी पुरेशे होते.
मृग नक्षत्राच्या काळात (७ ते ११ जून दरम्यान ) धूळ पेरणी केल्यास १५ ते ३०% उत्पादनात वाढ होते, असे काही शेतकर्यांचे अनुभव आहेत.
खत : शेणखत एकरी १५ ते २० गाड्या पुर्व मशागतीच्या वेळी द्याव्यात आणि कल्पतरू सेंद्रिय खत एकरी ६० ते ७५ किलो पेरणीच्या वेळी (बी टोकताना) द्यावे.
विरळणी : जर उगवण दाट झाली असेल तर पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करावी. देशी कापशीतील दोन रोपांतील अंतर २२.५ सेंमी तर अमेरिकन कपाशीत ३० सेंमी अंतर राहील, या पद्धतीने जादा झालेली रोपे काढून टाकावीत. संकरित वाणांचे प्रत्येक जागी एकच जोमदार वाढणारे व निरोगी रोप ठेवावे.
आंतरमशागत : पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांचे पीक होईपर्यंत गरजेनुसार १ ते २ निंदण्या व दोन कोळपण्या देऊन शेते तणविरहीत ठेवावे. निंदणी व कोळपण्यामुळे उत्पादनात निश्चितच वाढ होते.
कीड - रोगमुक्त, अधिक दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.
१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १५ ते २१ दिवसांनी ) : पिकाच्या जोमदार वाढीसाठी - जर्मिनेटर २५० मिली.+ कॉटन थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर १।। ते २ महिन्यांनी ) : कीड रोगमुक्त वाढ होऊन फुलपात्या अधिक लागण्यासाठी - कॉटन थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी २५० मिली + न्युट्राटोन २५० मिली. + १५० लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर २।। ते ३ महिन्यांनी ) : बोंड गळ होऊ नये. बोंडाचे पोषण होण्यासाठी, कीड, रोगमुक्त, कवडी होऊ नये, दर्जेदार, पांढरा शुभ्र लांब घाग्याचा कापूस निर्मितीसाठी - कॉटन थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ३०० मिली + २०० लि.पाणी.
वेचणी : कपाशीची ३० ते ४०% बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी. नंतर १५ ते २० दिवसांच्या अनाराने अंतराने तीन वेचण्या कराव्यात. वेचणी सकाळी किंवा संध्याकाळी वारा नसताना व हवेत दमटपणा असताना करवी. कारण त्यामुळे कापसाला वाळलेली पाने व काडीकचरा चिकटत नाही. वेचणी करताना पांढरा, स्वच्छ व फुललेला कापूस प्रथम वेचावा. तो वेगळा साठवावा. स्वच्छ कापूस पहिल्या २ -३ वेचण्यात मिळतो. पाण्यात भिजलेला कापूस, जमिनीवर पडलेला कापूस तसेच कवडी व किडका कापूस वेगळा वेचावा. अशा खराब प्रतीच्या कापसाची वाळवण, साठवण व विक्रीही वेगळीच करावी.
साठवण व विक्री :
कापूस साठविण्यापुर्वी तो उन्हात चांगला वाळवावा. नंतर कोरड्या व स्वच्छ जागी त्याची साठवण करवी. साठवणीच्या काळात धूळ, धूर व उंदीर यापासून कापसाचे संरक्षण करावे. कापूस जास्त दिवस साठवू नये. त्यामुळे त्याची प्रत कमी होत. त्यासाठी वेचनीनंतर शक्यतो लवकर विक्री करावी. विक्री करताना वेगवेगळ्या वाणांचा तसेच वेगवेगळ्या प्रतीचा कापूस वेगवेगळा विकावा. म्हणजे कापसाच्या प्रतीनुसार योग्य भाव मिळेल.
उत्पादन : पाऊसमान वेळेवर व प्रमाणात असल्यास चांगले नियोजन करून योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जिरायत कापसापासून एकरी ६ ते ८ क्विंटल उत्पादन मिळते. पण गेल्या २ -४ वर्षात पाऊस लांबल्याने व पावसाचे मान खूप कमी झाल्याने कापसाचा उतार १ ते २ क्विंटल एवढा कमी झाला आहे.