प्रतिकूल हवामानामध्ये कोरडवाहू, बागायती कपाशीचे संरक्षण
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
कापूस हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले महत्त्वाचे पैशाचे पीक असून मानवाच्या मुलभुत
गरजांपैकी एक आहे, खानदेश, मराठवाडा, विदर्भ तसेच आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मध्यप्रदेश
या भागांमध्ये कापूस हे पारंपारिक पीक गेल्या पाच वर्षांमध्ये अधिक भाव मिळाल्याने
व्यापारी पीक (Cash Crop) म्हणून शेतकरी करीत आहेत. तसेच हा भाग Assured Rainfall Zone
असल्यामुळे कापूस उत्तम प्रकारे येतो अशी शेतकर्यांची धारणा झाल्यामुळे कापूस हे हमखास
येणारे खात्रीचे पीक आहे असे या भागातील शेतकरी समजू लागले आहेत. परंतु काळ, परीस्थिती
बदलत आहे. कापूस उत्पादकांन अनेक नैसर्गिक, कृत्रिम पर्यायाने आर्थिक अडचणींना तोंड
द्यावे लागत आहे.
कापूस हे हमखास, खात्रीचे उत्पन्न देणारे व्यापारी पीक ठरल्याने (गेल्या काही वर्षापासून ) शेतकरी पैशाच्या मृगजळाच्या मोहापायी कपाशीचे बी चढ्या भावाने खरेदी करून एक पाऊस पडला की धुळपेर करतो. नंतर पुन्हा उघडीप पडते. पहिल्या पावसानंतर जरी वाफसा आला तरी ह्यामुळे फक्त ३०% जमीन ओली होते. ह्याच वाफश्यावर शेतकरी उत्साहाने पेरणी करतो.< अशा जमिनीखाली एक फुटाखाली उष्णता असते. तेव्हा पहिला पाऊस पडल्यानंतर ८ दिवसांमध्ये बीजांकुर दिसतो. हा बीजांकुर वाकडा, फिकट पोटरी रंगाचा, थोडासा उभट, पडणार्या पावसाचा थेंब झेलण्यासाठी सज्ज, आशादाशी असतो. परंतु याक्षणी जेव्हा पावसाची गरज असते. त्यावेळेस ८ दिवसांपासून ते १५ दिवसांनी उघडीप पडते. ही अवस्था ७ जून म्हणजे मृगाचा पहिला पाऊस सुरू होतो ते ३० जूनपर्यंत (आद्रा नक्षत्राचे पहिले चरणात ) कधीही येते. या अवस्थेमध्ये सुर्य उत्तरायणाच्या शेवटच्या टप्प्यात आलेला असतो. २२ जून नंतर सुर्याचे दक्षिणयनाकडील भ्रमणास सुरुवात होते. या अवस्थेतून सुर्याचे भ्रमण होत असताना उष्णतेची तीव्रता अधिक असते. तेव्हा हवेत ढग जमतात. हव बंद होते तेव्हा आपली अवस्था कोंडलेल्या घरातील माणसांसारखी अंगाची लाही लाही, गुदमरल्यासारखी, घामाच्या धारा वाहत असल्यासारखी होते. अशाच सदृश्य अवस्थेत शेतात बीजांकुर झालेले बी सापडते. सुर्य डोक्यावर आल्यानंतर संध्याकाळी ४ पर्यंत किरणांची तिरीप कापसाच्या बीजांकुरावर पडते. ज्या ठिकाणी बीजांकुर पुर्ण उगवलेला आहे. त्याचा अंकुर, शेंडा व एक बाजू हि सुरकुतून कापल्यासारखी होते. ज्या ठिकाणी बीजांकुर अजून ओव्हन (Oven) मधल्या बिस्कीटसारखी होते, त्याचप्रमाणे निघणार्या बीजांकुराची होते आणि त्यामुळे निघून येणारे बी हे पावसाने दिलेल्या ताणामुळे ८० ते १०० % पुर्ण वाया जाते. कोंब जळून जातो, कर्दळून मरतो व बी नाश पावतो, बी पोकळ होते.
प्रत्येक शेतकर्यांने संकरित कापसाच्या बियांसाठी एकरी ८०० ते १००० पासून २२०० रू. थैलीमागे खर्च केलेले असतात ते वाया जातात. परत पेरणीसाठी बी घ्यावे लागते व दुप्पट खर्च होतो. ही अवस्था टाळणेसाठी लागवडीपुर्वी कल्पतरू सारखे सेंद्रिय खात चौफुलीवर एक मुठ टाकून नंतर पुन्हा एका महिन्याच्या अंतराने २ ते ३ वेळा देऊन तसेच जर्मिनेटरचा बिजप्रक्रीयेसाठी वापर केल्यास डबल कापूस लागणीचा खर्च कमी होऊन आशेसाठी वाट बघणारी दुर्दशा होणार नाही. रासायनिक खतांचा वापर टाळावा. बीज प्रक्रीयासाठी जर्मिनेटर व प्रोटेक्टंटचा वापर पुढीलप्रमाणे करावा.
कापसाचे बियाची लवकर व अधिक प्रमाणत जोमदार उगवण व्हावी म्हणून १ किलो बियाणे २० ते २५ मिली जर्मिनेटर + १ चमचा प्रोटेक्टंट + अर्धा ते १ लि. पाणी या द्रावणात ४ ते ५ तास भिजवून, उपसून प्लॅस्टिक कागदावर पसरून सावलीत वाळवावे व नंतर चौफुलीवर लावावे. म्हणजे ५ ते ७ दिवसांत सुदृढ, हिरवा, टवटवीत कोंब बाहेर पडून पावसाने ताण दिला तरी कोंब जळत, मरत नाही व १० ते १५ दिवसांनी उघडीप पडूनही बिजांकुर निघालेले रोप तन सहन करून रोपे डौलाने वाढतात.
प्रतिकूल हवामानामध्ये पिकाचे संरक्षण : ज्येष्ठ आषाढ मासाची सुरुवात, ढगाळ हवा, मंद वारा किंवा कुंद वातावरण, झिमझिम पाऊस या अवस्थेमध्ये मावा, तुडतुडे यांचे प्रमाणे अधिक असते. फुल व पात्या लागत असतानाच गळण्याचे प्रमाण सुरू होते व वाढते. संकरित जातीमध्ये लाल्या, दह्या (टाक्या ), पानांवर ताक शिंपडल्यासारखे डाग पासून पानांची अन्न तयार करण्याची क्षमता क्षीण होते. जून व मध्यम आकाराची पाने गळून पडतात. फुले, पात्या, बोंडे यांची गळ अशी अवस्था होते. लागणार्या पात्या कमी लागतात. अशा बोन्दाचा कापूस कवडी होते. अशी अवस्था टाळणेसाठी खालील प्रमाणे उपाययोजना करावी.
बी उगवून आल्यानंतर पहिल्या महिन्यात अर्धा लिटर थ्राईवर (कॉटन स्पेशल ) + अर्धा लिटर क्रॉंपशाईनर + २५० ग्रॅम प्रोटेक्टंट + २५० मिली प्रिझम + २५० मिली न्युट्राटोन + १५० मिली हार्मोनी + १०० लिटर पाणी.
एवढी फवारणी करावी म्हणजे, जुलै, ऑगस्टमधील संभाव्य धोका टाळता येईल. १।। ते २ फुट झाडाची उंची असल्यानंतर वरील प्रमाण दुप्पट करावे व नंतर ह्याच प्रमाणात २ ते ३ फवारण्या कराव्यात. अशाप्रकारे सुरूवातीपासून योग्य ती खबरदारी घेतल्यास प्रतिकूल हवामानामध्ये देखील कापसाचे अधिक व दर्जेदार उत्पादन घेता येते. कापसाच्या बोंडाची वाढ झपाट्याने होते. बोंडामध्ये कापूस भरगच्च व वजनदार भरतो. त्यामुळे कापसाच्य वजनात वाढ होऊन, उत्पादन अधिक प्रमाणात मिळून कापसास 'ए' ग्रेड ' मिळते. तसेच कापसाची कवडीही होत नाही. माल लवकर तयार होताच, शिवाय ३ वेचण्यांमध्येच पीक मोकळे होऊन रब्बीच्या पिकास रान वापरता येते. तीनही वेचणीचा कापूस एकसारखा व चांगल्या प्रतीचा मिळतो. सप्तामृत, हार्मोनी ही औषध्ये व कल्पतरू सेंद्रिय खत वापरून कापसाचा यशस्वी खोडवासुद्धा परत घेत येतो.
३ ते ४ वेचण्या साधारण डिसेंबरपर्यंत पुर्ण होतात. तथापि शेतकरी पुढे ३ ते ४ महिने (मार्च, एप्रिलपर्यंत) पळखट्या शेतात बिनाकारण उभ्या ठेवून शेतीचा कस, पाणी वाया घालवितात हे चुकीचे व न परवडणारे असल्याने वरीलप्रमाणे तंत्रज्ञान वापरून यशस्वी खोडवा घ्यावा किंवा वेचणी पुर्ण झाल्यावर, डिसेंबरमध्येच थंडीत पळखाट्या उपटून, शेतीची नांगरट, करून दुबार पिकासाठी अथवा उन्हाळी भाजीपाल्यासाठी जमीन तयार करून ठेवावी.