मररोग, पानावरील रोग, मुळ कुज, खोड कुज यावरील जैविक उपाय

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ट्रायकोडर्मा: मातीमध्ये अनके प्रकारच्या बुरशी आढळतात. त्यामध्ये फ्युजपिरयम, पिथीयम, रायाझोप्टोनिया, रकेरे टोनिया व फायटोप्थोराच्या या बुरशींच्या काही प्रजाती ह्या जमिनीमध्ये राहून बियाणाच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम करतात. उगवणीनंतर पानावर किंवा झाडांच्या वाढीच्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात रोग निर्माण करतात. यांचे नियंत्रणासाठी बुरशीनाशके फवारावी लागतात, याकरिता फवारणीवर आर्थिक खर्च वाढतो.

जमिनीमध्ये आढळणार्‍या बुरशीमध्येही काही प्रजाती पिकांना नुकसानकारक असल्या तरी काही प्रजाती ह्या पिकांना फायदेशीर आहेत. यामध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशीची प्रजात फायदेशीर आहे. मातीमध्ये आढळणार्‍या बुरशीमध्ये बर्‍याच बुरशी ह्या नाशवंत वस्तुवर आपली परजीवी (उपजीविका करत) असतात. मात्र ट्रायकोडर्मा ही बुरशी रोग उत्पन्न करणार्‍या बुरशीवर परजीवी असल्याने मातीतील बुरशीपासून निर्माण होणार्‍या रोगांचे नियंत्रणासाठी महत्त्वपुर्ण बुरशी आहे. या बुरशीच्या एकूण ७ प्रजाती असल्या तरी भारतामध्ये ट्रायकोडर्मा विरीडी आणि ट्रायकोडर्मा हार्जीएनम ह्या २ प्राजाती आढळतात.

उपयोग : ह्या बुरशीचा उपयोग हा डाळवर्गीय पिके, तीळ, कापूस या पिकांच्या बिजप्रक्रीयेसाठी तसेच आद्रकाचे कंद कुजणे, कापसावरील मर रोग, पानावरील रोग, मुळकुज, खोडकुज यावर होतो. तसेच भाजीपाला डाळवर्गीय पिकांमध्ये मर रोग, मुळ्या कुजणे यावर याचा उपयोग होतो.

ट्रायकोडर्माचा पिकांनुसार वापर करण्याचे प्रमाण : कापूस -सुधारित व देशी वाणांना बिजप्रक्रियेसाठी २.५ ते ३ किलो बियाणास १० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी तर तूर, हरभरा, भुईमूग या पिकांच्या १ किलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी वापरावी.

वापरण्याची पद्धत : सर्व बियाण्यावर सारखा थर बसेल या प्रमाणे प्रकिया करून बियाणे सावलीत सुकवून ताबडतोब पेरणी करावी. ट्रायकोग्रामाचे पाकिट थंड जागी सावलीत ठेवावे. मातीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी एकरी २।। किलो ट्रायकोडर्मा पावडर २५ किलो शेणखतातून देऊन लगेच पाणी द्यावे.