७८६ चे अर्ध्या एकरात १ लाख २० हजार

श्री. महीपती भास्कर कुलकर्णी, मु. पो. भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली,
फोन. (०२३४७) २२१२२३


गेले ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर करीत आहे. सुरुवातीला पपई पिकावर वापर केला.

पपई ७८६ ची २० गुंठ्यामध्ये लागवड ८' x ८' वर केली होती. जमीन भारी काळी आहे. लागवडीपुर्वी ४ ट्रोली शेणखत संपुर्ण शेतात टाकले. लागवडीनंतर १ - १ महिन्याचे अंतराने ३ वेळा प्रत्येक झाडाला १ लि. स्लरी सोडत होतो. स्लरीमध्ये काळा गुळ ५ किलो + कडधान्याचे पीठ ५ किलो + गाईचे शेण २ पाट्या + गाईचे गोमुत्र ५ ते १० लि. इ. ५०० लि. पाण्यात ४ ते ५ दिवस भिजत ठेवून नंतर वापरले. याखेरीज दुसरे कोणतेच खत वापरले नाही.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत औषधांच्या एकूण ५ फवारण्या वेळापत्रकानुसार केल्या. पहिली फवारणी लागवडीनानात्र १ महिन्याने केली. नंतर १५ ते २१ दिवसांच्या अंतराने हवामानातील बदलानुसार फवारण्या करत होतो.

यामुळे बागेवर कुठलाही रोग आला नाही. झाडांची वाढ सुरूवातीपासून जोमदार झाली. झाडांभोवती मातीची हुंडी केली होती. तर अगदी जमिनीपासून फळे लागली होती. प्रत्येक झाडापासून साधारण १ किलो वजनाची १७५ ते २०० पर्यंत फळे मिळाली. सर्व पपई वाशी मार्केटला पाठविली. माल चालू झाल्यापासून ९ महिने बाग चालविली. १ लाख २० हजार रू. या अर्ध्या एकरमध्ये झाले. झाडे शेवटी शेवटी १५ फुटापर्यंत वाढली होती. यामुळे शेवटी मालाची काढणी करणे अवघड जात होते. तसेच अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळाल्याने बाग काढून टाकली.

त्यानंतर पुन्हा अर्धा एकर लागवड केली, तर वरील प्रमाणेच नियोजन करून याही बागेपासून १ लाख १० हजार रू. मिळाले होते.