पपईपासून एकरी एक लाख रुपये पपईची नवीन लागवड रोगमुक्त होण्यासाठी पंचामृताबरोबर प्रिझम व न्युट्राटोन

श्री. महादेव वासुदेव मुळे, मु. पो. शिराळ, (टें.) ता. माढा, जि. सोलापूर,
फोन:(०२५८२) २३२४८७


नोव्हेंबर २००३ मध्ये पपई बियाला जर्मिनेटर वापरल्यामुळे उगवण ८०% झाली. २॥ एकरमध्ये ६' x ७' वर लागवड होती. जमीन मध्यम काळी होती. ४० दिवसांचा प्लॉट झाल्यावर पानांवर विकृती आली होती. त्यावर सप्तामृत औषधांची फवारणी केल्यामुळे पानांवरील विकृती गेली. फुलकळी लागून माल भरपूर लागला. फुलगळ सुरुवातीला होत होती. ती फवारणीनंतर थांबली. नंतर पुन्हा १५ -१५ दिवसांनी सप्तामृताच्या ३ - ४ फवारण्या केल्या. साडेसात महिन्यात माल चालू झाला. सुरवातीला १ टन माल निघत होता. नंतर २॥ ते ३ टनापर्यंत माल सहा दिवसाआड निघत होता. सुरुवातीला ९ ते १० रू. किलो भाव मिळाला. परत ७ रू. किलो भाव मिळू लागला. जून - जुलै दरम्यान चालू झालेला माल अजून चालू आहे. एकरी १ लाख रू. उत्पन्न मिळाले.