डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सव्वा एकरात २.२५ लाख

श्री. दादासाहेब नारायण लबाडे, मु. पो. शेटफळ, ता. करमाळा, जि. सोलापूर


पपई ७८६ चे ३ पाकिटे बी जर्मिनेटरच्या द्रावणात भिजवून सुकवून लावले असता दहाव्या दिवशी ७० ते ७५% उगवण झाली. तसेच वांगी माहिको १० नं. चे ८ पाकिटे बी जर्मिनेटर द्रावणात भिजवून, सुकवून लावले असता ४ ते ५ दिवसात १००% उगवण झाली.

पपई फळांवर आली असता म्हणजे लिंबाएवढे फळ झाले असताना क्रॉंपशाईनर, राईपनरची फवारणी घेतली असता फळांचे पोषण होऊन फळे मोठी तजेलदार, टिकाऊ व चमकदार झाली. माल मुंबई मार्केटला विकला. त्यावेळी आम्हाला एका नगास २५ रू. (वजन ४ ते ४.५ किलो) भाव मिळाला. संपूर्ण सव्वा एकरात पपईचे २.२५ लाख रू. आज परत माहिती घेण्यासाठी आलो आहे व द्राक्ष पुस्तक घेवून जात आहे. हेच तंत्रज्ञान द्राक्षबागेलाही वापरणार आहे.