४८ डी. सेल्सिअस तापमानात दर्जेदार पपई बिहार, उत्तरप्रदेशच्या दलालांकडून थेट बागेतून मालाची खरेदी

श्री. देवीदास दगडू पाटील, मु. पो. औरंगापूर, ता. शहादा, जि, नंदुरबार,
मोबा. ९४२२२३८३४९


गेल्यावर्षी २८ एप्रिल २०१० रोजी आम्ही ७८६ पपईची लागवड डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने केली होती. भारी काळ्या ४ एकर जमिनीत ८' x ६' वर ही लागवड आहे पपईची ३७५० तयार रोपे आणून लागवड केली. ४८ अंश सें. तापमानातील या लागवडीस जर्मिनेटर ड्रेंचिंग (आळवणी) केल्यामुळे मारीचे प्रमाण कमी झाले. तापमान वाढीमुळे रोपांची मर झपाट्याने होत होती. ३७५० पैकी २७५० रोपे वाचली. त्यानंतर दर महिन्याला सप्तामृताची फवारणी घेत होतो. त्याचबरोबर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग सुरुवातीस १५ दिवसाला व नंतर दर महिन्याला करत होतो. कल्पतरू सेंद्रिय खत दर महिन्याला याप्रमाणे ५ - ६ वेळा मिळून ४ एकरला एकूण ३० बॅगा खत वापरले.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या संतुलित वापरामुळे बागेत अमुलाग्रह बदल जाणवू लागले. कल्पतरूने जमीन भुसभुशीत झाली. जर्मिनेटरच्या ड्रेंचिंगने पांढरीमुळी सतत कार्यक्षम राहून दिलेल्या खताचा योग्य वापर झाला. सप्तामृत फवारण्यामुळे व्हायरस किंवा इतर कोणतीही विकृती, रोग, कीड आली नाही. पाने अती उष्ण वातावरणातही हिरवीगार व टवटवीत होती. त्यामुळे फुलगळ, फळगळचा प्रादुर्भाव झाला नाही. फलधारणा चांगली झाली. ५ व्हा महिन्यात फळे लागली. खोडापासून १ फुटावरून फळे लागली होती, ती शेंड्यापर्यंत लागतच (वाढतच) गेली. एरवी अशा तापमानात झाडांवर फळे लागल्यानंतर झाडाची वाढ होताना फळांचा गॅप पडतो व फक्त शेंड्याला थोडी फळे लागतात. तसे यावेळी झाले नाही.

प्रत्येक फळ ३ - ४ किलोचे, खोडापासून १ फुटावरून ते ६ - ७ फुटापर्यंत ११ महिन्याच्या काळात फळे लागली आहेत. आतापर्यंत १२० टन माल निघाला आहे. बिहार, उत्तरप्रदेशचे व्यापारी जागेवरून स्वत: माल तोडून ४ ते ५ रू. किलो दराने नेतात. ७ महिन्याची पपई झाल्यानंतर (नोव्हेंबर २०१० मध्ये) तोडा चालू झाला. दर १० ते १२ दिवसाला तोडा होत असे. एप्रिल २०११ अखेरपर्यंत पपई चालती.

चालूवर्षी वरील अनुभवातून ४ एकर तैवान ७८६ पपई एप्रिल २०११ मध्ये डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने लावली आहे. त्यामध्ये सरांच्या सल्ल्यानुसार कांदा, कोथिंबीरीचे आंतरपीक घेणार आहे.