डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मिळवून दिले दर्जेदार उत्पादन व अधिक नफा.

श्री. सर्जेराव दगडू पाटील, मु. पो. शेणे , ता. वाळवा, जि. सांगली
मो. ९९२१८८३०९२


दोन वर्षापुर्वी १५ ऑगस्ट २००५ ला तैवान ७८६ पपईची लागवड डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १७ गुंठ्यात केली होती. दर महिन्याला सप्तामृताची फवारणी घेत असे. वातावरण खरब असल्यास १५ दिवसांनी फवारणी करत असे. ही पपई मध्यम जमिनीत ६' x ७' वर लावली होती. पाणी विहीरीचे पाटाने देत असे. ५ व्या महिन्यात फुलकळी लागून मे महिन्यामध्ये तोडे चालू झाले. १ ते ४.५ किलोची झाडांवर २०० ते २५० फळे होती. एका देठाला २ - ३ फळे लागली होती. पहिला तोडा मे मध्ये केला. त्याचे ४० हजार रू. झाले. ही फळे जानेवारी २००७ पर्यंत चालू होती. या पपईला नियमित फवारण्या घेतल्याने कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. या १७ गुंठ्यात दीड वर्षात सव्वा लाख रू. झाले.

आम्ही ७८६ पपईची नर्सरीही करतो. २॥ - ३ गुंठ्यामध्ये नर्सरी असून मी मध्ये प्रथम बी टाकून डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने रोपे तयार करतो. दरवर्षी ४० ते ५० पाकिटांपासून रोपे तयार करतो. बियांना जर्मिनेटर वापरत असल्याने उगवण वाढते व महागड्या बियापासून एका पाकिटापासून ५०० ते ५५० सशक्त रोपे मिळतात.

मागील २ वर्षापुर्वी पपई केलेल्या (१७ गुंठे) प्लॉटमध्येच १५ सप्टेंबर २००७ ला पपईची नवीन लागवड केली आहे. आतापर्यंत सप्तामृताच्या ४ फवारण्या केल्या आहेत. सध्या प्लॉट फुलकळी अवस्थेत आहे. झाडे निरोगी जोमदार आहेत. लागवड वरंब्यावर ६' x ७' वर केली आहे. या प्लॉटमध्ये वरंब्याच्या दोन्ही बाजूस गरवा कांदा तर मधल्या पट्ट्यामध्ये सुजाता मिरची लावली आहे. या दोन्ही पिकांना नियमित फवारण्या घेत आहे. मिरचीला मिरच्या भरपूर लागल्या आहेत. त्याचे तोडे न करता जागेवर पिकवायच्या आहेत.