प्रतिकुल परिस्थितीत बिहारमध्ये पपई (७८६) चे १ लाख रू.

श्री. राजेंद्रसिंग स्वर्ग भुवनेश्वर, मु. पो. कर्ना, ता. परक्ता, जि. खगडीया (बिहार).
मो. ०९१९९८२५७७१


'कृषी विज्ञान' चे अंक पाहिल्यानंतर सरांना भेटून आम्ही गेल्या वर्षी पपईचे बियाणे खरेदीसाठी पुण्याला आलो असता मार्केटयार्डमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसला भेट दिली. तेथे सविस्तर माहिती घेतली. तेव्हा सप्तामृत प्रत्येकी १ लि. घेऊन गेलो.

पपई तैवान ७८६ ची ६' x ७' वर २॥ एकरमध्ये ऑक्टोबर २००७ ला लागवड केली. याला रासायनिक खते वापरली. सरांनी सांगितल्याप्रमाणे ५ फवारण्या केल्या. आमच्या भागातील हवामान या पिकास अनुकूल नसल्याने उत्पादन अल्प प्रमाणात होते. त्यामुळे २० ते २५ रू. किलो भाव मिळतो. शक्यतो हे पीक कोणी करतच नाही. अशामध्ये आम्ही पपई पिक घेतले. त्याला हे तंत्रज्ञान वापरल्याने उत्पादन महाराष्ट्रातील उत्पादनाच्या तुलनेत कमी, मात्र आमच्या भागानुसार फारच चांगले मिळाले. फळे काढणीस सुरुवात झाल्यानंतर व्हायरस रोग पडू लागला, त्यानंतर त्याचे प्रमाण वाढतच जाऊन जेवढी फळे लागली होती तेवढीच मिळाली. त्यानंतर प्लॉट पूर्ण काढून टाकावा लागला. तरी या पपईचे १ लाख रू. झाले. आमच्या भात पपई पीक ३ - ३॥ महिन्याचे झाले की व्हायरसला बळी पडून पूर्ण प्लॉट वाया जातात. त्यामुळे शक्यतो हे पीक करणे टाळतात. त्यामुळे भाव खूप असतात, तरी मिळालेल्या उत्पन्नात आम्ही खूष आहोत.