अति उष्ण हवामानात डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने पपईचे दर्जेदार उत्पादन

श्री. प्रविण बाबुराव धनगर, मु. पो. सुनसगांव, ता. जामनेर, जि. जळगाव.


अभिजित कृषी सेवा, कासेगाव यांचेकडून तैवान ७८६ ची ८ रू. प्रमाणे ५५० रोपे आणली. त्याची लागवड ८' x ७' वर ऑक्टोबर २००४ मध्ये केली. जमीन तांबट असून पाणी नदीचे पाटाने देतो.

रोपे घेतेवेळी अभिजित कृषी मधून जर्मिनेटरची माहिती मिळाली. तेव्हा १ लि. जर्मिनेटर (२५० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे) च्या द्रावणात रोपांची मुळे १० ते १५ मिनिटे भिजवून नंतर लागवड केली. ४ ते ५ महिन्याची झाडे झाल्यानंतर फुलकळी लागली, तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत औषधांची फवारणी केली. त्यावेळी ऐन उन्हाळा (मार्च २००५) असूनही फुलकळीला फळे लागली, म्हणजेच फुलगळ झाली नाही. नंतर १ - १ महिन्याच्या अंतराने २ फवारण्या केल्या. त्यामुळे प्रत्येक झाडावर २०० च्या आसपास फळे आहेत. फळाचे १ ते १॥ किलो वजन भरते. फळाला शायनिंग असल्याने मार्केटमध्ये मागणी भरपूर आहे. पी. एल. कं. (पुणे) यांचे गाळ्यावर माल आणतो. तर ७ - ८ रू. किलो भाव मिळत आहे. ही पपई जूमध्ये (२००५) चालू झाली. आठवड्याला तोडा करतो. ७०० ते ८०० किलो पपई निघते. फळे काढल्यानंतर पेपरमध्ये गुंडाळून ५० किलोच्या पोत्यात (ठिक्यात) भरतो. एका ठिक्याला गावाहून पुण्यापर्यंत ३० रू. वाहतूक खर्च येतो. आजपर्यंत ३० गुंठे बागेसाठी २५,००० रू. खर्च आला आहे. आजपर्यंत ७ - ८ तोडे झालेत. एका तोड्याचे ३ ते ५ हजार रू. मिळतात.

गेल्या १५ दिवसापूर्वी कृष्णा नदीला पूर आल्याने बागेत ४ दिवस पाणी गुडघ्याइतके साचले होते. त्यामुळे झाडांची पाने काही प्रमाणात सुकली आहेत. झाडे निस्तेज दिसत आहेत. जी लहान फळे आहेत ती पोसण्यास अडचण येऊ नये म्हणून आज पुण्याला माल (विक्रीचा) घेऊन आलो असता सरांचा सल्ला घेण्यासाठी आलो. सरांनी थ्राईवर दीड लि., क्रॉंपशाईनर २ लि., राईपनर दीड लि., प्रिझम १ लि.,न्युट्राटोन १ लि., प्रोटेक्टंट दीड किलो हे ३०० लि. पाण्यातून फवारण्यास व आळवणी करण्यास सांगितले आहे.