पपई रोपांच्या विकृतीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रामबाण

श्री. कुंडलिक दौलत भडांगे, मु.पो. पहूर, ता. जामनेर, जि. जळगाव.
फोन (०२५८०) २४२३०८ मो.९४२१६८३६०


मी सप्टेंबर २००६ मध्ये पपईची नर्सरी सुरू केली तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांबद्दल माहिती नव्हती.

बी लावल्यानंतर १२ ते १५ दिवसांनी उगवण ७० % झाली. पाणी शॉवरने देत आहे. रोपांना ३ रे पान आल्यानंतर पाने पिवळसर होऊन बोकड्यासारखी जमा झाली (आकसली) होती. तेव्हा जामनेरचे रोपवाटीकावाले आले असता त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांची माहिती दिली. ते ही औषधे त्यांच्या रोपावाटिकेवर वापरतात.

त्यावरून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन सविस्तर माहिती घेतली. तेथील प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येक २५० मिली घेऊन गेलो. त्याची प्रत्येकी २ मिली प्रति लिटर पाण्यातून दाट फवारणी केली. त्याने पाने मोकळी (रुंद) होऊन टवटवीत दिसू लागली. नवीन कोवळी पाने फुटू लागली. त्यानंतर वरील प्रमाणतच ८ - ८ दिवसांनी २ फवारण्या वरील औषधांच्या केल्या, तर सध्या ५ हजार रोपांनी पूर्ण वाढ होऊन लागवडीस तयार आहेत.