पपई बियाची उगवण क्षमता वाढविण्यात जर्मिनेटरचे योगदान

श्री. सर्जेराव दगडू पाटील, मु. पो. शेणे , ता. वाळवा, जि. सांगली.
फोन. (०२३४२) २३९९३२


पपई बियाणे मुंबईहून आणले होते. त्याला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली. ८५ ते ९० % उगवण झाली. जर्मिनेटर न वापरता ५०% च उगवण होते. आमची पपईची बाग आणि नर्सरीसुद्धा आहे. बी उगवून आल्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने सप्तामृत औषधाच्या ३ फवारण्या करतो. ५० दिवसाचे रोप झाल्यावर शेतकऱ्यांना विकतो. १० -११ रू. ला एक रोप याप्रमाणे विक्री करतो. दरवर्षी २३ - २४ पाकिटातील बियांपासून ११ ते १२ हजार रोपे विकतो.

त्यातील घरी ७ एकर पपई लावली आहे. लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी रोपांच्या मुळ्या जमिनीत शिरल्यानंतर सप्तामृत औषधाची फवारणी केली. त्यामुळे झाडांना काळोखी येऊन, वाढ झाली, आतापर्यंत ५ फवारण्या झाल्या आहेत. प्लॉट ४ महिन्याचा आहे. फुलकळी लागली आहे. ही औषधे अभिजीत कृषी सेवा केंद्र, कासेगाव यांचेकडून खरेदी करतो. आता सध्या झाडाचे वरून चौथे पान पुर्ण पिवळे पडून गळत आहे. अशी एकरामध्ये ४ - ५ झाडे आहेत.

आपले 'कृषी विज्ञान' मी रोज एक तास वाचत असतो. त्यामुळे वारंवार वाचल्याने केव्हां, काय करावे हे कळते.

आमचे अनुभवानुसार काळ्या रानातील पपईचे फळावर कवडी (डोळा) पसरते. त्यामुळे बाजार कमी मिळतो. तर हलक्या रानातील फळावरील कवडी घट्ट आणि उठावदार असते. आपली पपई ही तोतापुरी आंबा संपल्यावर २० जुलैस चालू होते. पुढच्या वर्षी रमजान अगोदर १ महिना येईल तेव्हा परत पैसे होतील. शेतकऱ्यांनी पपईसाठी सल्ला विचारला तर आम्ही पत्ता देतो. कराडचे डॉ. देसाई ह्यांनी आपला सल्ला घेऊन पपईचे चांगले उत्पादन घेतले.