जर्मिनेटरमुळे पपई बियाण्यात ३ ते ३॥ हजाराची बचत तंत्रज्ञानाने पपई दर्जेदार व अधिक

श्री. शरद हिंदूराव चव्हाण, मु. पो. कोपर्डे हवेली. ता. कराड, जि. सातारा,
फोन. (०२१६४) २७१२४०, २७२०४०


तीन एकर पपई बियाला जर्मिनेटर वापरले. पहिल्या प्लॉटचे ८० ते ९०% बी उगवले. दुसऱ्या वेळेला ८०% उगवण झाली. एरवी ३० ते ५० % च उगवण होते. रोपे मागच्या डिसेंबरमध्ये केली. २ पुड्या बियापासून १२०० रोपे तयार झाली. जमीन चांगली असल्याने फक्त शेणखत वापरले. आमचे आतापर्यंत उसाखालील क्षेत्र होते. पपईला इतर रासायनिक खते किंवा कुठलीच फवारणी केली नाही. एरवी १००० रोपांसाठी १५०० रू. प्रमाणे (सध्या १८०० रू. प्रमाणे) ४ पुड्या घ्याव्या लागत होत्या. म्हणजे ६ ते ७ हजार रू. चे बियाणे लागत होते. ते आता जर्मिनेटरमध्ये ३ ते ३॥ हजार रू. तच होते. कारण १०० मिली जर्मिनेटर कोमट पाण्यातून बियाला वापरले तर २ पुड्यातच १२०० रोपे तयार होतात. त्यामुळे ३ - ३॥ हजार रुपये वाचतात. डिसेंबरमध्ये रोप तयार केल्यावर फेब्रुवारीमध्ये ६' x ७' वर लागवड केली. जून २००३ ला फुलावर आली. नोव्हेंबर २००३ ला पपई मार्केटला येऊ लागली. जमीन चुनखडीची आहे. चुनखडीच्या जमिनीत टोमॅटोला कॉलर रॉट होतो. वेळी येत नाही. मात्र अशा जमिनीत पपई चांगली येते असा आमचा अनुभव आहे. सध्या प्रत्येक झाडावर अडीच किलोची ४० - ५० फळे आहेत. मालास पुणे मार्केटला इंडिया फ्रुट यांचे गाळावर ४ रू. किलोप्रमाणे भाव मिळतो. २५०० किलो माल दर ८ दिवसाला आणतो. आता ५ एकर कलिंगड लावायचे आहे.

आमचे गावात कराड तालुका सेंद्रिय समिती स्थापन केली आहे. तिची मिटींग दर महिन्याच्या ३ तारखेला असते. त्यामध्ये रासायनिक खाताशिवाय सेंद्रिय पद्धतीने उत्पादने घेणे हा उद्देश असतो.