जर्मिनेटरमुळे ७८६ ची ऐन थंडीत ९०% उगवण

श्री. विष्णु संभाजी मोहिते, मु. पो. लऊळ, ता. माढा, जि. सोलापूर.
मो. ९८६०७४८३२८


तैवान ७८६ पपईचे बियांची ४ पाकिटे नोव्हेंबरमध्ये घेतली होती. तेव्हा थंडी असल्याने बरेच प्रगतीशील शेतकरी तसेच स्वत: दुकानदारानेही बियाने घेतेवेळी सांगितले की, यातील फक्त ४० ते ५० % उगवण होईल, यापेक्षा अधिक उगवण होणार नाही. तसेच उगवण व्हायला १५ ते २० दिवस लागतील.

अशा परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. विशेषत: उगवण क्षमता वाढविण्यासंदर्भातले जर्मिनेटरचे शेतकऱ्यांचे अनुभवही माझ्या वाचण्यात आले. त्यावरून जर्मिनेटर १०० मिली औषध घेऊन गेलो. ४ पाकिटे बियाण्यासाठी ३० मिली जर्मिनेटर २५० मिली पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये बियाने रात्रभर भिजविले. नंतर सकाळी सावलीमध्ये सुकवून प्लॅस्टिक पिशवीमध्ये २७ नोव्हेंबर २००४ ला लागवड केली.

बी उगवून येईपर्यंत दररोज दिवस झारीने पाणी देत होतो आणि पिशव्यांवर रात्री गोणपत अंथरूण सकाळी काढत असे. त्यामुळे रात्रीच्या कडक थंडीचा त्यावर विपरीत परिणाम होत नसे. अशा पद्धतीने जर्मिनेटर व गोणपटाचा प्रयोग केल्यामुळे उगवण ८ ते १० दिवसांत ९० % झाली. अंकुर दिसू लागल्यानंतर गोणपटाचे अच्छादन टाकणे बंद केले. त्याचा वेळी शेजारच्या शेतकऱ्याने २ पाकिटे बी घेतले होते. मात्र त्याने जर्मिनेटर व आच्छादनाच वापर न केल्याने फक्त १० % च उगवण झाली. त्यामुळे त्यांनी लागवड करणे रद्द केली.