डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपईची पिवळी पाने हिरवी होऊन फळगळ थांबली

श्री. परमेश्वर पाटील, मु. पो. पिंपरखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव ४२५००१


मी तैवान ७८६ पपईच्या १००० रोपांची फेब्रुवारीमध्ये लागवड केली. पुढे हवामानातील बदलानुसार रासायनिक औषधांची फवारणी केली. पण पाहिजे तसा बाग दिसत नव्हता. काही दिवसांनी पपईची पाने पिवळसर पडून फळगळ व्हायला सुरुवात झाली. तेव्हा मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी आमच्या गावात भेटले. मी त्यांना माझा बाग दाखवला. त्यानंतर त्यांनी मला थ्राईवर, न्युट्राटोन हे औषधे फवारण्यास सांगितले. त्यानंतर आठ दिवसांनी ही औषधे आणून प्रति पंपाला ५० मिली घेऊन पहिली फवारणी केली. पाच ते सहा दिवसांनी माझा पपईचा बाग हिरवागार दिसून आला व फळगळही थांबली. गावातले इतर शेतकरी माझा प्लॉट बघण्यासाठी साठी शेतावर येतात व विचारतात. तेव्हा मी त्यांची भेट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधींशी करून दिली. माझ्या पपईला माल चांगला लागत आहे व भावही चांगला मिळत आहे. आता मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे इतरही पिकांवर वापरणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पंचामृत, प्रिझम, न्युट्राटोन ही औषधे वापरून अधिक उत्पादन घेऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी असे माझे मत आहे.