उन्हाच्या तीव्र झटक्यापासून रोपांचे संरक्षण

श्री. संजय बाबुराव धनगर, मु. पो. सुनगाव, ता. जामनेर, जि . जळगांव


तैवान ७८६ जातीच्या पपईचे बियाणे पिशवीत रोपांसाठी टाकले होते. त्यांची उगवण चांगली झाली. रोपे वाढत असताना माहिती नसल्यामुळे रोपांचे शेंडे ओपने (उघडे) केले असता उन्हाचा तीव्र झटका बसून पाने जागेवरच सुकायला सुरुवात झाली. यावर उपाय म्हणून आमचे मित्र श्री. सुभाष कडू पाटील यांना या बद्दल विचारले. हे शेतकरी पपई, केळी, खीरा, काकडी, टरबूज या सर्व पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून अधिक व दर्जेदार उत्पादन घेतात. त्यांनी मला जळगाव शाखेच्या प्रतिनिधींचा पत्ता दिला. त्याप्रमाणेमी त्यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या प्लॉटवर येऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या सल्ल्यानुसार या पपईच्या रोपांना जर्मिनेटर व थ्राईवर या औषधांची दर तीन दिवसांनी फवारणी केली असता १८ दिवसांत संपूर्ण रोपे लागवडीयोग्य ९ ते १२ इंचापर्यंत झाली. या फवारणीमुळे माझे नुकसान पुर्ण वाचले. आता ३० दिवसापुर्वी जर्मिनेटर ची आळवणी करून ७' x ७' वर रोपांची लागवड केली आहे. पपई निघेपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत वापरणार आहे.