कर्नाटक, बिहारमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई यशस्वी

श्री. रविकुमार, एन. जी. ओ. एस. कॉलनी प्लॉट नं. २४४, जेवरगी रोड, गुलबर्गा (कर्नाटक)
फोन (०८४७२) ४५१४३६


आमच्या भागामध्ये पपईचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर आहे. मी त्या भागात सल्लागार म्हणूनही परिचित आहे. माझी स्वत: ची २०० एकर शेती आहे. २००४ मध्ये खराब हवामानामुळे पपईवर रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. पपईची पाने पिवळी पडून आतील बाजूस बशीसारखी गोळा होऊन पानाला होल पडले. पाने फाटण्याचे प्रमाण बधून पानांमधील शिरांभोवती गुंडाळली जाऊन पंजासारखी झाली होती. तेव्हा त्याचा काळात पुण्याला बी खरेदीसाठी आलो असता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळाली, त्यावरून न्युट्राटोनचे १ - १ लिटरचे २ आणि ५ लि. चे १ कॅन घेऊन गेलो होतो.

शेजारच्या मुलाच्या पपई बागेवरही वरीलप्रमाणेच रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. तेव्हा त्याला १ लिटर न्युट्राटोन दिले. त्याने ते फवारल्यानंतर तिसर्‍याच दिवशी पपईची पाने हिरवीगाट, टवटवीत झाली. जी लहान, आकसलेली पाने होती ती रुंद, पसरट होऊन, नवीन फुट निघाली. हा फरक फवारलेल्या बागेवर जाणवल्यानंतर उरलेल्या क्षेत्रासाठी त्याने माझ्यासाठी आणलेले ५ लिटरचे न्युट्राटोनचे कॅन माझ्या गैरहजेरीत माझ्या माणसाकडून नेऊन फवारले.

माझ्यासाठी मग पुन्हा पुण्याहून न्युट्राटोन व प्रिझम, पंचामृत प्रत्येकी १० - १० लि. औषधे घेऊन गेलो. दिलेल्या प्रमाणानुसार औषधांचा वापर केला तर बाग पुर्ण सुधारला.

गेल्या वर्षीची शिल्लक औषधे चालू वर्षीही वापरली. ३ वर्षीची ४ एकर पपई बाग होती. तिचे दोन वर्षे उत्पादन चांगले मिळाले. मात्र यावर्षी झाडांचे पाने गळली होती. फुट कमी होती, त्यावर ही औषधे वापरल्यानंतर पाने टवटवीत होऊन फुट निघाली ही टेक्नॉंलॉजी आम्ही ग्रुपमध्ये करत असलेल्या १०० एकर पपई बागेसाठी वापरतो.

जुन्या बागेची झालेली फुट वाढण्यासाठी आणि दुसर्‍या प्लॉटमधील माल लागलेल्या बागेचा माल पोसण्यासाठी आज थ्राईवर व राईपनर १० - १० लि. आणि प्रिझम १ लि. घेऊन जात आहे. त्यासोबत जर्मिनेटर १ लि. नवीन एक एकार पपई लागवडीसाठी घेतले आहे. ही औषधे घरापासून ३ कि. मी. क्षेत्र चालू होते. त्या पपईला वापरणार आहे. घराजवळील दीड एकरसाठी स्वतंत्र १ - १ लिटर थ्राईवर व राईपनर घेतले आहे.