'कृषी विज्ञान' मधील अनुभव वाचून पपईचा व्हायरस जाईल ही एक मोठी आशा

श्री. विनोद लक्ष्मणदास शहा, मु. पो. खेतीया, ता. पानसेमाल, जि. बडवाणी (मध्यप्रदेश)
मो. ०९९७५३९३६२१


माझेकडे कानडी, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे शंभर एकर जमीन भारी, मध्यम ते हलक्या स्वरूपाची आहे. आजपर्यंत रासायनिक व सेंद्रिय खते, औषधे अशी पारंपारिक पद्धतीने शेती करत असे. माहे डिसेंबर २००९ मध्ये जळगाव येथे कृषी प्रदर्शनामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलवर भेट देऊन माहिती घेतली व 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली. मासिकाचे वाचन करून पुणे ऑफीसमधुन फोनवरून माहिती घेऊन चार एकरमध्ये ६' x ८' वर १ जून २००९ मध्ये लावलेल्या ४००० पपई रोपांना नोव्हेंबर २००९ मधे व्हायरस दिसत होता. ते प्रमाण आज ५० ते ६० % पर्यंत आहे. त्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची माहिती घेण्यास आलो आहे.

येथे समाधानकारक मार्गदर्शन मिळाल्याने तसेच पपईवरील व्हायरस आटोक्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखाली 'कृषी विज्ञान' मासिकातून प्रसारीत झालेल्या वाचल्यावर आपल्या प्लॉटवरील व्हायरस आटोक्यात येईल अशी अशा वाटल्याने जर्मिनेटर ५ लि. आणि सप्तामृत प्रत्येकी १ लि. घेऊन जात आहे.