कमी पाणी व खारवट जमिनीतही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई यशस्वी

श्री. विजयकुमार भरत गायकवाड, मु. पो. पाथरी, ता. बार्शी, जि. सोलापूर


तैवान ७८६ या जातीची मुरमाड जमिनीत ६' x ६' अंतरावर नोव्हेंबर २००० ला लागवड केली. २ पाकिटे पपईच्या बियांसाठी जर्मिनेटर ची बीज प्रक्रिया केली होती. बियांची उगवण जर्मिनेटर मुळे ९० % झाली. रोपांवर दहा दिवसाच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ फवारण्या घेतल्या. त्यामुळे रोपांवर कोणताही रोग आला नाही, शिवाय रोपांची वाढ जोमाने झाली. नंतर जर्मिनेटर च्या द्रावणात रोपे बुडवून खड्ड्यात लागवड केली. लागवडीनंतर साप्तामृत औषधांची चुळ भरल्यामुळे (आळवणी केल्याने) रोपांनी माना टाकल्या नाहीत. आठवड्याने सप्तामृत औषधांची फवारणी केली, त्यामुळे मर झाली नाही. झाडांनी वाढ जोमाने एकसारखी झाली. रोग येऊ नये, म्हणून सप्तामृत औषधांच्या दीड महिन्याच्या अंतराने माल चालू होईपर्यंत ३ फवारण्या केल्या. फुलकळी चौथ्या महिन्यातच भरपूर लागली. फवारण्या केल्यामुळे फुलगळ अजिबात झाली नाही. पहिला तोडा ९ व्या महिन्यात चालू झाला. एका तोड्याला ३॥ टन माल निघाला. नंतर माल वाढतच गेला. दुसरा तोडा १० दिवसांनी केला. त्यावेळी ४ टन माल निघाला. या काळात पाणी कमी पडू लागले, तेव्हा सरांच्या सल्ल्यानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमध्ये क्रॉंपशाईनरचे प्रमाण वाढवून ८ - ८ दिवसाला स्प्रे घेऊ लागलो. तर कमी पाण्यावरही फळ एकसारखे, मोठे २ किलो वजनाचे होते. असे १० दिवसाच्या अंतराने १५ तोडे झाले. सर्व माल जागेवर व्यापाऱ्यांनी ३ - ४ किलोने घेतला. त्यामुळे दलाली, वाहतुक इ. खर्च वाचला. या पपईपासून खर्च वजा जाता १.२५ लाख रू. निव्वळ नफा मिळाला. माल मागे भरपूर होता. परंतु पाण्याअभावी बाग मध्येच सोडावी लागली.

गेल्या सिझनचा हा चांगला अनुभव आल्यामुळे पुन्हा १ एकर पपई लागवड जर्मिनेटर वापरून १ डिसेंबरला केली. प्लॉटला सप्तामृत औषधे व कल्पतरू सेंद्रिय खत वापरत आहे.