केशरमध्ये ७८६ चे आंतरपीक, ४ महिन्यांत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फुलकळी

श्री. सोपान निवृत्ती कोल्हे, १/५३, विद्यानगर, तांबरी विभाग, आर. पी. कॉलेजसमोर, अस्मानाबाद.
मो.९४२१८७५४१३


तैवान ७८६ पपईची ६५० रोपे मोहोळवरून ७ रू. प्रमाणे आणून दोन एकर केशर आंब्यामध्ये मार्च २००८ मध्ये लावली. केशर आंबा १५' x १५' वर २ वर्षापुर्वी लावलेला आहे. त्यामध्ये दोन झाडांच्यामध्ये एक पपईचे झाड याप्रमाणे लागवड केली आहे. रोपांना लागवडीच्यावेळी शेणखत आणि रासायनिक खत दिले. नंतर ४ महिन्याची झाडे झाल्यावर पुन्हा रासायनिक खताचा एक डोस दिला.

पपईचा व्हायरस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आटोक्यात पपईला नियमित १५ ते २० दिवसांच्या अंतराने 'सप्तामृताच्या' फवारण्या करत असल्याने ४ थ्या महिन्यात फुलकळी लागली. मात्र जमीन भारी काळी असल्याने खोडापासून १ फुटावरून जी पपई लागते, ती ३ - ४ फुट उंचीवरून लागण्यास सुरुवात झाली. आठव्या महिन्यात झाडांवर ५० - ६० फळे असताना तोडा सुरू झाला. पहिल्या तोड्याला ७ टन माल निघाला. नंतर प्रतिकूल हवामानामुले व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. जास्त प्रादुर्भाव झालेली ४ झाडे काढून टाकून बाकीच्या प्लॉटवर सप्तामृताची फवारणी ८ - ८ दिवसांनी सलग दोन वेळा केली, त्याने व्हायरस पुर्णपणे आटोक्यात आला. त्यानंतर पुन्हा २० -२० दिवसांच्या अंतराने सप्तामृताच्या फवारण्या चालू ठेवल्याने पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. पुढे दर २० - २५ दिवसांनी तोडा करत असे. प्रत्येक तोड्याला ७ - ८ टन माल निघत असे. आतापर्यंत ६ तोडे झाले असून ४२ ते ४५ तन माल निघाला आहे. व्यापारी मालाची स्वत: तोडणी करून बागेतून माल घेऊन जातात. २॥ ते ४ रू. किलोप्रमाणे भाव मिळाला. पहिल्या ३ - ४ तोड्याच्या मालाला गोडी चांगली होती. नंतर मात्र कमी झाली. तेव्हा सरांनी संगिल्याप्रमाणे राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. २०० लि. पाण्यातून फवारले. त्यामुळे गोडी वाढली. सध्या झाडांवर ३० - ३५ फळे असून फुलकळी लागतच आहे. अजून १० ते १५ टन माल सहज निघेल. पपई काढल्यानंतर त्याचा आंब्यामध्ये कारले डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने लावणार आहे.