डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे पपईच्या बाजारभावात वाढ

श्री. संजय नाथाजीराव पाटील, मु. पो. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली.
मो. ९४२३८६९७२६


मी भाजीपाल्याचे उत्पादन सतात घेत असतो. आमची गाडी असल्याने पुणे मार्केटला भाजीपाला घेऊन येत असतो. २००४ साली असेच मार्केटला आलो होतो, तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा बोर्ड पाहिला व माहिती घेण्यासाठी ऑफिसमध्ये गेलो असता सरांना भेटलो. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार गेली ४ वर्षापासून ५ एकर क्षेत्रामधून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने यशस्वीरित्या उत्पादन घेत आहे.

गेल्यावर्षी १० ऑक्टोबरला तैवान ७८६ पपईची मुरमाड मध्यम प्रतिच्या ३० गुंठे जमिनीत ६' x ८' वर लागवड केली. अगोदर त्याच जमिनीत दोडक्याचे पीक यशस्वीरित्या घेतले होते. या पपईला लागवडीच्यावेळी खड्डयामध्ये शेणखत १५ गाड्या आणि गांडुळखत २ टन दोन टप्प्यात दिले.

लागवडीनंतर रोपांना जर्मिनेटर ५० मिली + १० लि. पाणी याप्रमाणात आळवणी (ड्रेंचिंग) केल्याने कुठेही मर दिसून आली नाही. रोपे सतेज वाढू लागली. त्यानंतर १५ दिवसांनी सप्तामृतची एक फवारणी घेतली. त्याने पानांना काळोखी चांगली आलेली दिसली. त्यानंतर रासायनिक खतांचा १ डोस दिला आणि सव्वा ते दीड महिन्याचा प्लॉट असताना सप्तामृताची दुसरी फवारणी केली. तेवढ्यावर झाडे कंबरेला लागली. खोड जाड, झाडे सशक्त, पाने रुंद निरोगी होती. त्यानंतर ३ ॥ महिन्याची झाडे झाल्यावर व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी तिसरी फवारणी सप्तामृत प्रत्येकी १ लि. ची. २५० लि. पाण्यातून केली. ४॥ महिन्यात फुलकळी लागली. प्लॉट ५ महिन्याचा झाल्यावर फुलकळी,भरपूर तसेच लहान फळे लागलेली असताना ती गळू नयेत यासाठी चौथी फवारणी साप्तमृत प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून केली. याच अवस्थेत फवारणी थोडी उशीर (तिसरीनंतर) झाल्याने २ - ३ झाडांवर व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यामुळे चौथ्या (वरील) फवारणीत सप्तामृतासह न्युट्राटोन ६० मिली/ १० लि. पाणी याप्रमाणे घेतले. त्याने त्या २- ३ झाडांवरील व्हायरस गेलाच, शिवाय नंतर इतर कुठल्याही झाडावर व्हायरसची लक्षणे आढळली नाहीत. पुढे फळे पोसण्यासाठी गरजेनुसार एकूण तीन फवारण्या सप्तामृताचा केल्या. झाडावर ८० ते १२० फळे लागली होती. (संदर्भ : 'कृषी विज्ञान' , नोव्हेंबर २००८ कव्हरवरील फोटो)

फळांचा पहिला तोडा ७ जुलै २००८ ला केला, प्रत्येक आठवड्याला तोडा करीत होतो. आजपर्यंत १३ तोडे झाले असून १२ टन माल वाशी मार्केटला विकला. माल डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने उत्कृष्ट प्रतिचा तसेच ऐन रमजानमध्ये आणता आल्याने भाव ११ रू. / किलोस मिळाला. त्याची संदर्भसाठी सोबत पट्टी छापली आहे.

अजून ४ - ५ महिने तोडे चालतील. सरासरी 3२ ते ३५ टन माल मिळेल, असे प्रात्प परिस्थितीनुसार वाटत आहे. आजूबाजूचे शेतकरी आवर्जुन बाग पाहण्यास येतात. या ३० गुंठे पपईपासून आजपर्यंत ९७,६६८ रू. झाले असून एवढेच पैसे होतील अशा सुस्थितीत बाग आहे.