खारवट जमिनीतील पपयास सप्तामृताचा प्रयोग

श्री.शांतीलाल उत्तम पाटील, मु. पो. जावदा, ता. शहादा, जि. नंदुरबार.
फोन. (०२५६३) २४४२१५


आमच्या नवीन बागेतील पपईची पाने पिवळी पडून गळून जात होती. त्यामुळे काही झाडांना एकसुद्धा पण राहिले नव्हते. तेव्हा ही अडचण आपल्या जळगावच्या कृषी विज्ञान केंद्रातील प्रतिनिधींना सांगितली. त्यांनी या विकृतीसाठी सप्तामृत औषधांच्या दोन फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने घेण्यास सांगितले. त्यावरून पहिली फवारणी लगेच घेतली. त्याचा परिणाम ७ - ८ दिवसांनी जाणवला. लहान - लहान फुट निघू लागली. आता पूर्ण पानांनी झाडे छत्रीसारखी दाट झाली आहेत.

ही पपई खारवट जमिनीत आहे. त्यामुळे सरांनी त्याकरीता धैंच्या या हिरवळीच्या खताचा वापर करण्यास सांगितले आहे. तो प्रयोग करणार आहे.

जुन्या पपईचा माल ४॥ महिन्यापासून चालू आहे. आतापर्यंत १२ - १३ गाडी (ट्रक) माल निघाला. एक फळ साधारण ३ - ४ किलो वजनाचे होते. माल अजून दीड महिन्यापर्यंत चालू राहील. आता बाहर संपत आल्यामुळे फळे १॥ ते २ किलो वजनाची आहेत. बाजारभाव सरासरी ४ ते ४॥ रू. किलो मिळाला. बागवान घरी येउन माल घेऊन जातात. या बहारापासून अडीचे ते पावणेतीन लाख रू. झाले. १ एकरसाठी साधारण ५० हजार रू. खर्च झाला.