रोगट पपईचा शेंडा फुलला

श्री. राजेंद्र दत्तात्रय खोपडे, मु. पो. नाझरे, ता.भोर, जि. पुणे.
फोन. (०२११३) २८३६३०


माझ्याकडे नाझरे येथे २० एकर शेती असून मी सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहे. आज रोजी ४० गुंठे पपई ७८६ साधारण आठ महिन्याची चालू परिस्थितीत आहे. पाऊस सततधार असल्यामुळे पपईची झाडे वरून सुकल्यासारखी दिसत आहेत. पाने आकसली असून पिवळसर पडली आहेत. माझा वैयत्किक सेंद्रिय शेतीवरच विश्वास आहे. त्यामुळे रासायनिक औषधे, खतांचा अजिबात अवपर न करता मी डॉ.बावसकर सरांचा सल्ला घेण्यासाठी आलो आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार सप्तामृत (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन) घेऊन जात आहे. जमिन तांबूस आहे.

ता. क.

पपईला सरांनी सांगितल्याप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वरील सर्व औषधे ७० - ८० मिली १५ लि. पाण्यासाठी घेऊन फवारणी केली आणि याचप्रमाणामध्ये द्रावण तयार करून प्रत्येक झाडास ५०० मिली द्रावणाची चूळ भरली. एकूण १ एकर क्षेत्र आहे.

आता शेंडा फुलला आहे आणि निघणारी फुट हिरवीगार आहे. गेल्या दोन महिन्यापुर्वी (मे ०५) श्री. भास्कर लक्ष्मण डुंबरे (डुंबरेमळा, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्या प्लॉटवर जो रिझल्ट मिळाला, तोच अनुभव आम्हाला आला. ते कृषी विज्ञान जून २००५ च्या कव्हरवरील फोटो पाहिल्यानंतर जाणवले. त्यानंतर पुन्हा १२ व्या दिवशी आणि नंतर १५ दिवसांनी सप्तामृत प्रत्येकी ७० - ७५ मिलीची १५ लि. पाण्यातून फवारणी केल्याने बाग पूर्णता निरोगी आहे.