कडक उन्हाळ्यात विदर्भात ७८६ यशस्वी

श्री. अविनाश केळकर, मु. पो. कारंजा लाड, जि. वाशिम,
फोन. (०७२५६) २२३४४५


एप्रिल २००७ मध्ये दीड एकर तैवान ७८६ पपई लावली आहे. जमीन हलक्या प्रतिची असून लागवड ७' x ७' वर आहे. या पपईची वाढ निरोगी होण्यासाठी सप्तामृत औषधांच्या दोन फवारण्या फुलकळीच्या अवस्थेत घेतल्या. माल डिसेंबरमध्ये चालू झाला. फेब्रुवारी अखेरपर्यंत २५ टन माल ३२५ रू. क्विंटलप्रमाणे दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी जागेवरून मालाची तोडणी करून नेला. आम्ही फक्त वजन करून दिले.

या झाडांवर ४ ० - ५० फळे आहेत. मात्र झाडांचा शेंडा सुकत आहे. बोकड्या झाल्यासारखी पाने आकसत आहेत. तेव्हा सरांना फोन केला असता., सरांनी सप्तामृत १ - १ लि. फवारण्यास सांगितले. त्यावरून वापरणार आहे.