वेलापत्रकाप्रमाणे पपईस फवारणी म्हणजे उत्तम पीक व समाधान

श्री. रमेश रामदास पाटील, मु. पो. टाकरखडे, ता. नांदुरा, जि. बुलढाणा, फोन. (०७२६५) २६४३७३


माझ्या मित्राने मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती सांगितली. त्यावरून मी पपई लागवडीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे पपईचे पुस्तक घेऊन गेलो. ते २ वेळा व्यवस्थित वाचून त्यात अनुभव दिलेल्या जवळच्या दोन शेतकऱ्यांकडून औषधांबद्दल खात्री केली.

त्यानंतर जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामधून सप्तामृत औषधे १ - १ लिटर आणि कल्पतरू सेंद्रिय खत घेऊन गेलो.

७८६ पपईचे बी ५ पाकिटे जर्मिनेटर च्या द्रावणात भिजवून सावलीत सुकवून पिशवीमध्ये लावले असता उगवण ८० % च्या पुढे मिळाली. उगवणीनंतर ८ दिवसांनी रोपे ४ पानांवर आल्यावर वरील औषधांची प्रत्येकी २ मिली प्रति १ लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. रोपांची मर न होता रोपे टवटवीत होऊन वाढ सुरू झाली. रोपांचा पिवळटपणा जाऊन हिरवी होऊन लागवडीस आली.

नंतर रोपांची ६ - ६ फुटावर अडीच एकरमध्ये लागवड केली. लागवडीच्या वेळी खड्डयामध्ये शेणखतासोबत कल्पतरू सेंद्रिय खताचा (२०० ते २५० ग्रॅम/ खड्डा) वापर केला आणि लागवडीनंतर आठवड्याने सप्तामृत औषधांची फवारणी केली. एवढ्यावर झाडांची २॥ फुटापर्यंत निरोगी, जोमदार वाढ झाली. कुठेही पान पिवळे पडले नाही. आमच्या शेजारच्या शेतकऱ्याने या तंत्रज्ञानाचा वापर न केल्याने त्यांची झाडे पिवळी पडून रोगास बळी पडली. परिणामी प्लॉट वाया गेला.

आम्ही नंतर कल्पतरू सेंद्रिय खताचा डोस देऊन पुस्तकात दिल्याप्रमाणे सप्तामृताच्या दोन फवारण्या केल्या. तर ५ व्या महिन्यात फुलकळी लागली. वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या घेतल्याने कोणत्याही अवस्थेत पिकास रोगाचा दुष्परिणाम झाला नाही. फुलकळी ची गळ अजिबात न होता फलधारणा झाली. नंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर,न्युट्राटोनच्या चौथ्या फवारणीने फळांचा आकार वाढण्यास सुरुवात झाली. फळे टवटवीत होती. कुठेही फळांवर डाग नव्हते. त्यानंतर पुन्हा थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर आणि न्युट्राटोनची पाचवी फवारणी घेतल्याने फळांचे पोषण अधिक होऊन, गोडी वाढली. रंग चांगला आला.

एकंदरीत उत्पादनात वाढ होऊन इतर औषधांचा खर्च कमी झाला. आमच्या गावात आमचा बाग एक नंबर मला आणता आला, याचा सार्थ अभिमान आहे. हे केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शक्य झाले.