ऐन उन्हाळ्यात पिवळी पडलेली पपई दुरुस्त होऊन दर्जेदार उत्पन्न

श्री. पद्माकर योगराज पाटील, मु. पो. तरडी, ता. शिरपूर, जि. धुळे.
मोबा. ९०४९४६१८८२


आम्ही नर्सरीमधून तैवान ७८६ ची तयार ३००० रोपे आणून १२ एप्रिल २०१० रोजी लागवड केली. जमीन मध्यम काळी असून लागवडीतील अंतर ६' x ६॥'आहे. पपईला लागवडीच्यावेळी डी.ए.पी. आणि ३:१५:० या खतांची मात्रा दिली होती. ही पपई १ महिन्याची झाल्यानंतर अति उष्णतेमुळे झाडांची पाने जळत होती. पिवळी पडून गळून जात होती. झाडे लहान आणि तापमान अधिक असल्याने रासायनिक औषधाची फवारणी करावी तर त्याचा फायदा होण्यापेक्षा रोपांना झटका बसला तर रोपे जळून जातील याचीही भिती होती.

उष्णतेणे जळालेली पाने तिसर्‍या दिवशी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दिली नवीन फूट

आमच्या गावातील एका शेतकर्‍याने आम्हाला या पपईस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्यास सांगितले. ते डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने त्यांच्याकडून कं. प्रतिनिधी श्री. विनोद पाटील यांचा फोन नं. (९३७०६३९५७२) घेऊन संपर्क साधला. बागेची परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी जर्मिनेटर थ्राईवर, क्रॉंपशाईनर व प्रोटेक्टंटची फवारणी करण्यास सांगितले. सल्ल्याप्रमाणे श्री जयमाताडी ट्रेडर्स मोबा. (९८६०२१९११९) यांचेकडून औषधे आणून फवारणी केली, तर तिसर्‍या दिवशीच नवीन फुट येऊ लागली. पाने हिरवी होऊ लागली. झाडांची थांबलेली वाढ सुरू झाली. या अनुभवावरून पुढे सतत श्री. विनोद पाटील यांच्या संपर्कात राहून डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरत गेलो.

वरील प्रमाणे पुन्हा १५ ते २० दिवसांनी २ फवारण्या केल्या. तसेच जर्मिनेटरचे दर महिन्याला याप्रमाणे ३ वेळा ड्रेंचिंग (प्रति एकरी १ लि. जर्मिनेटर + २०० लि. पाणी याप्रमाणे) केले, त्यामुळे श्रावण महिन्यापर्यंत कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. ड्रेंचिंगमुळे पांढर्‍या मुळीचा जारवा वाढला, त्यामुळे झाडांचीही वाढ जोमाने होऊन फुलकळी ब फळे श्रावण महिन्यात लागली होती.

त्यानंतर फळे पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, सोबत राईपनर, न्युट्राटोनचा वापर केला. त्यामुळे रोगाप्रतीकारशक्ती वाढून फळे पोसण्यास मदत झाली. त्यांनतर पुढे दर महिन्याला वरील प्रमाणे तीन फवारण्या केल्या.

२ एकरात ४ लाख, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा खर्च फक्त १८ हजार रू.

नोव्हेंबर महिन्यात तोडे चालू झाले. फळांचे वजन सरासरी ३ ते ४ किलो याप्रमाणे मिळाले, झाडावर जमिनीपासून १ फुटावरून फळे लागली होती. चोपड्याचे व्यापारी स्वत: येऊन मालाची तोडणी करून नेत होते. त्याचा खर्च टनाला १५० रू. मजुरी आणि वजनामध्ये क्विंटलला ५ किलो कपात याप्रमाणे आम्हाला लावत असे. ही पपई ४ - ५ महिने फेब्रुवारी अखेरपर्यंत चालली. २ एकरात (३००० झाडे) एकूण ८० टन उत्पादन मिळाले असून अजून ७ - ८ टन माल झाडावरून निघेल. मालाला चमक आकर्षक असल्याने सुरूवातीच्या तोडयांना ८ रू. किलो भाव मिळाला. पुढे भाव कमी होत गेले. तरी सरासरी ६ रू. किलो भाव मिळाला. २ एकरात एकूण ४ लाख रू. उत्पन्न मिळाले. या प्लॉटला ५० हजार रू. खर्च झाला. त्यातील १८ हजार रू. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी खर्च करून एवढे उत्पादन घेता आले.